मुंबई

यादवनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई

CD

यादवनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई
राखीव भूखंडावर बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली
वाशी, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली विभागातील यादवनगर परिसरात राखीव भूखंडावर उभारलेल्या अनधिकृत झोपड्यांविरोधात महापालिकेने मोठी कारवाई केली. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे आणि उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ही निष्कासन मोहिम राबवली.
यादवनगर परिसरातील पालिका शाळा क्रमांक ७७ च्या शेजारील मलनिस्सारण केंद्र (एस.टी.पी. प्लांट) साठी राखीव ठेवलेल्या भूखंडावर काही व्यक्तींनी बेकायदा झोपड्या उभारल्या होत्या. या झोपड्यांचा धोका आणि सार्वजनिक सुविधांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने कारवाईची सुरुवात केली. ही मोहिम सहायक आयुक्त आणि विभाग अधिकारी सुनील काठोळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ८ मजूर, २ जेसीबी मशीन, १ डंपर, तसेच अतिक्रमण विभागाचे पोलिस पथक तैनात होते. या प्रभावी उपाययोजनेतून झोपड्या तोडक पद्धतीने हटवण्यात आल्या. यापुढे देखील राखीव भूखंडांवर किंवा सार्वजनिक सुविधांवर बेकायदा बांधकामे झाल्यास कठोर अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाईल. नागरिकांनी सार्वजनिक जागांचा गैरवापर करणे टाळावे, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. यापूर्वी देखील ऐरोली विभागात अशा प्रकारच्या अनधिकृत झोपड्यांविरोधात नियमितपणे कारवाई होत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT