मुंबई

वादळी वाऱ्यासह पावसाचा तांडव

CD

वादळी वाऱ्यासह पावसाचे तांडव
व्यापारी, शेतकऱ्यांचे नुकसान
टिटवाळा, ता. २३ (वार्ताहर) : कल्याण आणि मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी (ता. २१) संध्याकाळी ५ वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या अचानक आगमनामुळे मुरबाड शहर व परिसरात मोठी धावपळ उडाली.

मुरबाड बाजारपेठेत पावसाचा जोर वाढल्याने व्यापारी, फेरीवाले, तसेच शेतमाल विक्रेते यांनी आपला माल सावरण्यासाठी धावपळ केली. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर फेरीवाल्यांचा माल ओला होऊन वाया गेला. काही मिनिटांतच रस्ते पाण्याखाली गेल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान, मुरबाड-नगर महामार्गावरील नारायणगाव पट्ट्यात वादळी वाऱ्यामुळे मोठी झाडे कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्ता दिसेनासा झाल्याने वाहनांची मोठी रांग लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली, मात्र प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकरीवर्गाला बसला आहे. तालुक्यातील भातशेतीची उभी पिके वादळी पावसामुळे भुईसपाट झाली आहेत. अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने आधीच चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
स्थानिक हवामान खात्याने पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षितस्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्याच्या या अनपेक्षित तडाख्यामुळे मुरबाड तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT