आदिवासी पाड्यावर फराळवाटप
डोंबिवली (बातमीदार) : बदलापूरच्या सामाजिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या ‘सिटीझन वेल्फेअर असोसिएशन’ या संस्थेने दिवाळीच्या निमित्ताने चोण येथील मोऱ्याचा पाडा या आदिवासी पाड्यावर जाऊन सामाजिक उपक्रम राबवला. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेतील सदस्यांनी आदिवासी बांधवांसाठी खाऊ, कपडे आणि दिवाळी फराळाचे वाटप केले.
या उपक्रमांतर्गत संस्थेच्या सदस्यांनी मोऱ्याच्या पाड्यातील मुले आणि महिलांना नवीन साड्या, खाऊ, कपडे आणि खास दिवाळी फराळ यांचे वाटप केले. दिवाळीच्या उत्साहात या उपक्रमाने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. या कार्यक्रमाला चोण ग्रामपंचायत समितीचे उपसरपंच गणेश कुन्हाडे आणि समाजसेवक विष्णू गावंडे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष दिलीप नारकर, सचिव राजेंद्र नरसाळे, संस्थापक सदस्य गुरुनाथ तिरपणकर, सुवर्णा इसवलकर, दिलीप शिरसाट, मंगेश सावंत, सुहास सावंत, महेश सावंत, विलास साळगावकर, चंद्रकांत चिले, विलास हंकारे यांच्यासह सदस्य मिलिंद मिशाळ, किशोर सारंग, गंधाली तिरपणकर, प्रकाश देशपांडे, आणि अजित शिंगे यांनी विशेष सहभाग घेतला.
...............................
पणती, रांगोळी व सुगंधी उटण्याचे ५००० किट वाटप
टिटवाळा (वार्ताहर) : दिवाळी म्हणजे आनंद आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव. याच पार्श्वभूमीवर मांडा-टिटवाळा परिसरात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस (उद्योग आघाडी) परेश गुजरे यांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजात उत्साहाची नवी लाट आणली आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांसाठी ५००० हून अधिक ‘दिवाळी किट’ वाटप कार्यक्रम आयोजित केला. या आकर्षक किटमध्ये पणत्या, रांगोळी आणि सुगंधी उटणे यांचा समावेश होता. या उपक्रमात परिसरातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हा उपक्रम सणांच्या साजरीकरणात स्थानिक पातळीवर एकतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला. या निमित्ताने परेश गुजरे यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना भेटून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी लक्ष्मी देवीची चांदीसदृश फ्रेम भेट देऊन जनसंपर्क साधला. गुजरे यांच्या या आगळ्यावेगळ्या पुढाकारातून तरुणाईचा जोश, समाजाशी असलेले आपुलकीचे नाते आणि संघटनात्मक बांधिलकीचा त्रिवेणी संगम त्यांच्या कार्यशैलीत दिसून येतो. या कार्यातून परेश गुजरे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक ‘नवा, ऊर्जावान आणि संवेदनशील चेहरा’ म्हणून उदयास येत असून, त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा ठसा स्थानिक पातळीवर उमटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.