मुंबई

ब्रेकनंतर शासकीय कामे सोमवारपासूनच

CD

ब्रेकनंतर शासकीय कामे सोमवारपासूनच
पोलिस खाते सोडून सर्व सरकारी कार्यालयांना आठ दिवसांचा ब्रेक; नागरिकांच्या कामांवर परिणाम
वसंत जाधव/ सकाळ वृत्तसेवा.
पनवेल, ता. २३ (बातमीदार) ः दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पनवेलसह संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कामकाज अक्षरशः ठप्प झाले आहे. या आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात केवळ शुक्रवार हा एकमेव कार्यालयीन दिवस असला, तरी अनेक अधिकारी-कर्मचारी वैद्यकीय रजा किंवा इतर कारणांनी त्या दिवशीही गैरहजर राहण्याची शक्यता असल्याने प्रत्यक्षात सरकारी कार्यालयांचा कारभार जवळपास आठ दिवस बंदच राहणार आहे. परिणामी, नागरिकांची शासकीय कामे प्रलंबित राहून त्यांना चांगलीच अडचण येणार आहे.
एकूणच, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांमध्ये ‘सुट्टीचा माहोल’ तयार झाला असून, आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर शासकीय कामकाज सोमवारपासून सुरू होईल. तोपर्यंत मात्र नागरिकांना त्यांच्या कामांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, तर पोलिस मात्र दिवसरात्र ड्युटीवर सज्ज राहून कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत. स्थानिक सुट्टी, दिवाळीची अधिकृत सुट्टी आणि शनिवार-रविवारच्या नियमित सुट्ट्यांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आठ दिवसांचा सलग ‘ब्रेक’ मिळाला आहे. सोमवारी स्थानिक सुट्टी, मंगळवार ते गुरुवार दिवाळी सुट्टी, शुक्रवार कामकाजाचा एकमेव दिवस आणि पुढे शनिवार-रविवार सुट्टी, अशा या ‘सुट्टी मालिकेमुळे’ कार्यालयांत शुकशुकाट दिसणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रजा घेण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महसूल विभाग, शिक्षण विभाग, महापालिका तसेच इतर अनेक शासकीय कार्यालयांचे दार ठोकून येणाऱ्या नागरिकांना निराश परत जावे लागू शकते.
.............
नागरिकांच्या कामांवर परिणाम
या ब्रेकमुळे नागरिकांच्या विविध महत्त्वाच्या कामांवर परिणाम होणार आहे. उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, जमीन नोंदणी, बांधकाम परवानगी, मालमत्ता कर भरपाई, परवाने, तसेच महापालिका आणि जिल्हा परिषदेतील विविध योजना यांच्या अर्जांची प्रक्रिया ठप्प होणार आहे. अनेक ठिकाणी ऑनलाइन सेवा चालू असल्या तरी त्या फाइल्सवर अंतिम सही व मंजुरीसाठी अधिकारी हजर नसल्यामुळे नागरिकांची कामे रखडणार आहेत. विशेषतः शैक्षणिक व प्रशासकीय कामे, निविदा प्रक्रिया आणि शासकीय कार्यालयांतील तातडीच्या मंजुरींचा वेग मंदावेल. नागरिकांना सुट्टीनंतर सोमवारी कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यावर प्रचंड गर्दीचा सामना करावा लागेल, असे बोलले जात आहे.
...........
चौकट
फक्त पोलिस खाते ऑन ड्युटी
या सर्व सुट्ट्यांदरम्यान केवळ पोलिस खाते मात्र २४ तास ऑन ड्युटी राहणार आहे. सणासुदीच्या काळात शहरात सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने सर्व पोलिस ठाणे, वाहतूक विभाग, नियंत्रण कक्ष आणि गस्त पथके कार्यरत राहतील. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून कर्तव्य बजावतात, ही बाब उल्लेखनीय आहे. त्यामुळे ‘सुट्टी’ हा शब्द त्यांच्यासाठी केवळ इतरांसाठी असतो, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
....................
चौकट
बँका मात्र दोन दिवस सुरू
मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस बँकांना दिवाळी सुट्टी असल्याने कामकाज बंद राहिले, मात्र गुरुवार व शुक्रवार या दिवशी बँकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. त्यानंतर दुसरा शनिवार आणि रविवार या दिवशी पुन्हा सुट्टी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT