मुंबई

मोलाचा जीव संकटात

CD

मोलाचा जीव संकटात
कळंबोली, कामोठेतील ४० सोसायट्यांना नोटिसा, अग्निशमन यंत्रणा बंद
रवींद्र गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. २५ ः कामोठेतील आंबे श्रद्धा इमारतीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेल्या आगीत मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने शहरातील बंद असलेल्या अग्निशमन यंत्रणांचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. कळंबोली, कामोठेतील ४० सोसायट्यांना अग्निशमन दलाने नोटिसा बजावल्या आहेत; पण दुर्लक्षामुळे भविष्यात अशा घटनांमधून मोलाचा जीव संकटात सापडण्याची शक्यता आहे.
गृहसंकुलांतील अग्निशमन यंत्रणा ही एक महत्त्वाची उपाययोजना आहे. या सुविधेमुळे धूर किंवा उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची आगाऊ सूचना रहिवाशांना मिळते. त्यामुळे पाणी किंवा इतर अग्निशामक पदार्थांचा फवाऱ्यातून आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. ही यंत्रणा सर्व इमारतींना बंधनकारक आहे. बिल्डिंगला भोगवटा प्रमाणपत्र देताना अग्निशमन यंत्रणा आहे की नाही, याची तपासणी केली जाते. त्यासाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर संबंधित इमारतीला ओसी दिली जाते; मात्र आग लागल्यानंतरच यंत्रणेची आठवण होते. कामोठेतील आंबे श्रद्धा सोसायटीमध्ये झालेल्या या चुकीमुळे तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने दोघींचा नाहक बळी गेला.
---------------------------
या गोष्टी आवश्यक
नियमित तपासणी ः अग्निशमन यंत्रणेची नियमित तपासणी, देखभाल करावी.
प्रशिक्षण ः अग्निरोधक उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण रहिवाशांना द्यावे.
कवायती ः आपत्कालिन परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रात्यक्षिके गरजेची
-----------------------------
अग्निरोधक यंत्रणा गरजेची का?
- नागरिकांच्या सुरक्षेसाठी फायर सेफ्टी यंत्रणा बसवली पाहिजे. कायद्याने ते सक्तीचे आहे. आग लागणारच नाही, अशी हमी कोणीही देऊ शकत नाही; पण लागलीच तरी आपण फायर सेफ्टी यंत्रणेमुळे तत्काळ आटोक्यात आणू शकतो. दुर्घटना टाळू शकतो.
- फायर सेफ्टी ऑडिट पात्र अग्निसुरक्षा व्यावसायिक, अग्निसुरक्षा सल्लागार किंवा अग्निसुरक्षा व्यवस्थापन आणि नियमांमध्ये कौशल्य असलेल्या सक्षम मूल्यांकनकर्त्यांद्वारे केले जाते.
------------------------------
कारवाईची तरतूद
फायर सेफ्टी यंत्रणा बसवल्याशिवाय परवानाच दिला जात नाही. तरीही नियमांचे उल्लंघन केल्यास, फायर सेफ्ट यंत्रणा बसवली नसल्याचे आढळून आल्यास तीन दिवसांची नोटीस दिली जाते. त्यानंतर सात दिवसांची नोटीस दिली जाते. त्यानंतरही काही केले नाही, तर त्यांचे वीज, पाणी, परवाना रद्द करण्यास सांगितले जाते. शिवाय परवानाही रद्द होऊ शकतो.
----------------------------
काही प्रमुख घटना
मार्च २०२२ ः मिर्ची गल्ली येथे एका घराला आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नोव्हेंबर २०२३ ः पळस्पे फाट्याजवळील साई वर्ल्ड सिटीमधील एका फ्लॅटला आग लागली होती.
जुलै २०२५ ः कळंबोलीतील रोडपाली येथे किराणा माल, खारघरमध्ये चायनीज दुकानाला आग लागली.
ऑक्टोबर २०२५ ः पनवेलमधील एका इमारतीत लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला.
ऑक्टोबर २०२५ ः कळंबोली आणि खारघर येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. एका महिलेसह कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला.
ऑक्टोबर २०२५ ः पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाजवळ जनरेटरला आग लागल्याची घटना घडली.
-----------------------------------
पनवेल महापालिका क्षेत्रांमधील गृहसंकुलधारकांनी अग्निशमन प्रतिबंधक कायद्यानुसार नाहरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. आपत्कालीन घटना व त्यातील जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी आवाहन केले आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
---------------------------------------
इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देताना अग्निशमन यंत्रणा आहे की नाही, याची तपासणी केली जाते. त्यासाठी स्थानिक अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. त्यानंतर संबंधित इमारतीला ओसी दिली जाते. सोसायट्यांना अग्निशमन यंत्रणेची दुरुस्ती, देखभाल बंधनकारक आहे.
- प्रवीण बोडके, मुख्य अग्निशमन अधिकारी, पनवेल महापालिका
-------------------------
सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत आहेत. महापालिका क्षेत्रातील अनेक इमारतींमधील अग्निसुरक्षा कार्यान्वित नाही. कामोठे दुर्घटनेतून ही बाब पुढे आली आहे. प्रशासनाबरोबरच नागरिकांनीसुद्धा जागृत होण्याची गरज आहे.
- जयश्री झा, महिला अध्यक्ष, कामोठे कॉलनी फोरम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

रिक्षातून प्रवास करणाऱ्या आजीबाईला लुटणाऱ्या चौघी जेरबंद! बुडालेल्या समर्थ बॅंकेच्या लॉकरमधून पैसे घेऊन जात होत्या घरी, वाढदिवसाच्या दिवशीच चोरी

SCROLL FOR NEXT