मुंबई

कॉलम

CD

ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकर स्टिकवाटप
विरार (बातमीदार) : आरोग्य, शिक्षण, राजकारण, सहकार क्षेत्रात ठाकूर कुटुंबाचे योगदान मोठे आहे. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यासाठी मदत करण्याचे व्रत ठाकूर कुटुंबाने घेतले आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी आज (ता. ३०) विरार येथे केले. भास्कर वामन ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री जीवदानी देवी संस्थान संचालित भास्कर वामन ठाकूर शिक्षण संकुल, सहकार नगर येथे ठाकूर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विरारमधील श्री जीवदानी देवी संस्थान येथे स्व. भास्कर वामन ठाकूर आरोग्यसेवा ट्रस्टचे उद्‍घाटन करून ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकर स्टिकवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जीवदानी देवी ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर, उपाध्यक्ष पंकज ठाकूर, माजी नगरसेवक विलास बंधू चोरघे, डॉ. वसंत मंगेला, जयप्रकाश चौधरी, रोम्मी ठाकूर, ॲड. नयन जैन, किरण ठाकूर, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, अमर कोंडाळकर आणि अमित कोंडाळकर उपस्थित होते. या वेळी १२५ स्टिक्सचे वाटप केले.
---
शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
वसई (बातमीदार) : विरार पश्चिम येथील शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवसैनिकांची जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या हस्ते महिला आघाडी तालुका संघटक अश्विनी चव्हाण यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. या वेळी शहरप्रमुख रोहन रमाकांत चव्हाण, उपशहरप्रमुख नरेंद्र आचरेकर, उपशहरप्रमुख सुयोग उत्तेकर, उप शहर संघटक अनुषा पेनगोंडा हे उपस्थित होते. विरार येथील अरविंद बाळकृष्ण कदम (विभाग प्रमुख), योगेश बाळकृष्ण राणे (शाखाप्रमुख), जगन्नाथ बाबाजी मोरे (उप-शाखाप्रमुख), रितेश चंद्रकांत धाडवे (युवासेना विभाग अधिकारी), मनीषा दिनकर सोनावणे (महिला विभाग संघटक), सुचिता अरविंद कदम (महिला शाखा संघटक), भारती भरत सोलकर (महिला उपशाखा संघटक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय, प्रशासकीय समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी, तसेच संघटनावाढीसाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
---
गांडूळ खतनिर्मितीतून व्यावसायिकतेचे धडे
वाणगाव (बातमीदार) : पिकांचे अवशेष, जनावरांपासून मिळणारी उपउत्पादिते, हिरवळीच्या खतांची पिके, घरातील केरकचरा, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न व झाडांचा पालापाचोळा, घरातील सांडपाणी आदी सेंद्रिय पदार्थ वापरून विद्यार्थ्यांनी गांडूळ खतनिर्मिती केली आहे. वाणगाव-आसनगावमधील कृषी तंत्र विद्यालयातील कृषीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील जागेत गांडूळ खत प्रकल्प उभारून भविष्यात रोजगारनिर्मितीचे साधन निर्माण केले आहे.

शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागल्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकांवर, तसेच जमिनीत दिसून येऊ लागला आहे. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी, मानवी आरोग्य आणि गांडूळ मित्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे रासायनिक खतांऐवजी शेतीला वरदान असणारी सेंद्रिय खते बनवण्याची पद्धत आज शेतकऱ्यांनी जोपासली पाहिजे, असे कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य सोनालिका पाटील यांनी सांगितले. कृषी तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर दरवर्षी पाच टन गांडूळ खत निर्मिती केली जाते. प्रक्षेत्रावर सेंद्रिय भाजीपाला व इतर उत्पादने घेतली जात असल्यामुळे प्रक्षेत्रावर गांडूळ खतनिर्मितीतूनच भाजीपाला पिकांना ही खते दिली जातात.
---
संदीप भोईर यांना प्रथम पारितोषिक
कासा (बातमीदार) : धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भगवान बिरसा कला संगम ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आदिवासी एकता मित्र मंडळ, प्रगती प्रतिष्ठान, लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. राज्यातून सुमारे दहा हजार कलाकारांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील ऑनलाइन चित्रकला विभागात वेती येथील वारली चित्रकार संदीप माधव भोईर यांनी विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या वारली चित्रकलेवर आधारित स्टोरी दूरदर्शन नॅशनलवरील गावसे विथ निलेश मिश्रा या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT