शिवसेनेचा चांदिवलीत पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः शिवसेनेचा चांदिवली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.
चांदिवली विधानसभा क्षेत्रात उज्ज्वल व परिणामकारक काम सुरू असल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले. आमदार दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा घेण्यात आला.
आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेवक किरण लांडगे, विभाग संघटक अशोक माटेकर उपस्थिती होते. आमदार दिलीप लांडे यांनी विभागात गतवर्षांपासून सातत्याने पूर्ण केलेल्या विकासकामांचा आढावा सादर केला.
मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वजण तयारीला लागा. विकासकामे घराघरात पोहोचवा आणि लोकांच्या हृदयात विश्वास निर्माण करा.