खारघरमध्ये ५१व्या मजल्यावर आग
खारघर, ता. ६ (बातमीदार) ः खारघर सेक्टर ३६ मधील अधिराज टॉवरमध्ये बुधवार रात्री ५१व्या मजल्यावर आग लागली. आगीत घरातील सर्व साहित्य खाक झाले.
खारघर सेक्टर ३६ मधील अधिराज टॉवरमधील ५१व्या मजल्यावरील घराला आग लागली. या घरात मुनावर शेख नावाची व्यक्ती भाड्याने राहते. बुधवार रात्री आग लागल्याची माहिती खारघर अग्निशमन जवानांना मिळाली. आगीची घटना उंचीवर असल्यामुळे ७० मीटर सीडीच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला. यासंदर्भात खारघर अग्निशमन केंद्रात विचारणा केली असता आगीत घरातील सर्व साहित्य खाक झाल्याचे सांगितले.
---
सुमित्रा चव्हाण ६/१२/२५ सोबत फोटो जोडले आहे.
---