इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) ः पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात निर्माणधीन इमारतीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ६) घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माणधीन इमारतीवरून खाली पडून श्यामकुमार राॅय (वय २५, रा. बिहार) या कामगाराचा मृत्यू झाला. पुढील तपास खडकपाडा पोलिस करीत आहेत.
---