क्रांती इंदे यांचा सन्मान
जोगेश्वरी (बातमीदार) ः मेघवाडी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपाई क्रांती लिंगप्पा इंदे (कुपाडे) यांनी ‘मिस अँड मिसेस महाराष्ट्र’ या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘ग्रेडिएंट मिस महाराष्ट्र’ हा मानाचा किताब पटकावला. अंधेरीतील एचव्हीपीएस बॅन्क्वेट हॉल येथे स्पर्धा झाली.