मुंबईत रविवारी इनोव्हेशन महाकुंभ
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; महिला उद्योजकतेला राष्ट्रीय व्यासपीठ
मुंबई, ता. ६ : देशभरातील नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा एक अभूतपूर्व सोहळा मुंबईत एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू संकुलात रविवारी (ता. ९) होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील या पहिल्याच राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन महाकुंभ २०२५चे उद्घाटन होणार आहे.
या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्र सरकारचे शिक्षण सचिव विनीत जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबत डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यासोबत देशभरातील तब्बल ५०हून अधिक विद्यापीठांतील कुलगुरू, ३००हून अधिक उद्योजक तसेच देशभरातील विविध विद्यापीठांतील संशोधक विद्यार्थिनी या महाकुंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी आज मुंबईत दिली. महर्षी धोंडो कर्वे यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी विद्यापीठाला ९ नोव्हेंबरला ११० वर्षे पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर या महाकुंभाचे आयोजन केंद्र व राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. हा महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा, उद्योग शिक्षण सहयोग दृढ करणारा आणि ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाकडे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असून, यात एसएनडीटी विद्यापीठातील तसेच इतर विद्यापीठांतील ११०हून अधिक विद्यार्थिनींनी विकसित केलेल्या नवसंकल्पना, उत्कृष्ट स्टार्टअपच्या संकल्पनांचे सादरीकरण केले जाणार आहे.
...
२०० प्राध्यापकांना प्रशिक्षण
या उपक्रमासाठी २०० प्राध्यापकांना उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात आले तसेच ३००हून अधिक विद्यार्थी कल्पना निवडण्यात आल्या आहेत. यात १५०हून अधिक विद्यार्थिनींचे प्रोटोटाइप्स व स्टार्टअप कल्पना विद्यार्थी टीमद्वारे विशेष प्रदर्शन स्टॉलमध्ये सादर केल्या जातील. उद्योग आणि गुंतवणूकदार विद्यार्थी नवोन्मेषकांशी थेट संवाद साधून त्या कल्पनांचे संवर्धन, व्यापारीकरण आणि विस्तार करण्यासाठी सहकार्य करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.