बी. फार्मसीच्या १४,४५५ जागा रिक्त
चाैथ्या प्रवेश फेरीनंतरची स्थिती; १२ नाेव्हेंबरपर्यंत प्रक्रिया
मुंबई, ता. ६ : यंदाच्या शैक्षणिक वर्षात बी. फार्मसी प्रवेशाच्या चौथ्या फेरीनंतर तब्बल १४ हजार ४५५ जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांचे हे प्रमाण सर्वाधिक असून, पुढील फेरीदरम्यान यावर प्रवेश न झाल्यास अनेक महाविद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) वाटेल त्या ठिकाणी बी. फार्मसीच्या (औषधनिर्माणशास्त्र) महाविद्यालयांना परवानगी दिल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
राज्यात सध्या बी. फार्मसीची एकूण ५३० महाविद्यालये आहेत. यात प्रवेशाची एकूण क्षमता ४२ हजार ६३० इतकी आहे. या उपलब्ध जागांवरील प्रवेशाच्या चौथ्या फेरीचे प्रवेश नुकतेच पूर्ण झाले असून, यातही १४ हजार ४५५ इतक्या रिक्त जागांची संख्या समोर आली आहे. या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत १६ हजार ६०४ असे सर्वाधिक प्रवेश झाले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीत आठ हजार ८० आणि तिसऱ्या फेरीत तीन हजार ५७८ आणि चौथ्या फेरीत केवळ तीन हजार ६३३ इतकेच प्रवेश झाले आहेत. रिक्त जागांवरील प्रवेश प्रक्रिया १२ नाव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
--
एम. फार्मसीला प्रतिसाद
एम. फार्मसीच्या चौथ्या प्रवेश फेरीनंतर केवळ ३८० जागा रिक्त राहिल्या आहेत. या प्रवेशांना राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पहिल्या फेरीत एक हजार ७३३, दुसऱ्या फेरीत एक हजार ४८१ आणि तिसऱ्या फेरीत ९९० आणि चौथ्या फेरीत काही नव्याने प्रवेशासाठी सामील करण्यात आलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याने दाेन हजार ५२६ प्रवेश झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.