आमच्यावर अन्याय का?
मुंबई, ता. ६ ः समग्र शिक्षातील समावेशित कार्यक्रमातील कंत्राटी तत्त्वावर मागील काही वर्षांत केवळ एक ते दोन महिने शिक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांना कायम केल्याने त्यावर समग्रमध्ये कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेत आम्हाला कायम कधी करणार, असा सवाल केला आहे.
मागील १५ वर्षांहून अधिक सेवा केलेल्या त्याच अभियानातील इतर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे सोडून केवळ काही महिनेही सेवा केलेली नाही, अशा अनेक शिक्षकांना कायम केल्याने समग्र शिक्षामधील इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमच्यावर अन्याय का केला, असा सवाल शिक्षण विभागाला विचारला आहे.