भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करतात. मात्र, नीट परीक्षेतील गोंधळामुळे भिवंडीतील एका विद्यार्थिनीचे हे स्वप्न धुळीला मिळाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन वेगवेगळ्या गुणपत्रिका मिळाल्याने ही विद्यार्थिनी आणि तिचे पालक चिंतेत सापडले आहेत.
भिवंडीजवळील शेलार येथील श्वेता कृष्णा पिनाटे ही विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील होती. तिचे वडील यंत्रमाग कारखान्यात काम करून मुलीला उच्च शिक्षण मिळवून देण्याचे स्वप्न पाहत होते. २०२४ मध्ये कमी गुण मिळाल्यानंतर श्वेताने खचून न जाता पुन्हा अभ्यास करून २०२५ची नीट परीक्षा दिली. १४ जूनला जाहीर झालेल्या निकालात तिला ४९२ गुण आणि ऑल इंडिया रँक ७६,३१९ दाखवण्यात आली. या निकालामुळे आनंदित झालेल्या श्वेताने वैद्यकीय प्रवेशासाठी अर्ज प्रक्रियाही सुरू केली.
मात्र, निवड यादीमध्ये तिच्या नावापुढे केवळ २७५ गुण आणि रँक ५,१८,१८० अशी आकडेवारी दिसताच तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. चौकशीसाठी सीईटी सेल कार्यालयात गेल्यानंतर तिला राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. श्वेताने १ नोव्हेंबरला एमसीसी, एनटीए आणि केंद्रीय आरोग्य शिक्षण मंत्रालयाला ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. माझ्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. दोन निकालपत्रांमुळे मी कोणते सत्य मानावे हेच कळत नाही. माझे वडील मध्यमवर्गीय आहेत; लाखो रुपये शुल्क देऊन शिक्षण घेणे शक्य नाही, असे श्वेताने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.