मुंबई

भाजपला रोकण्यासाठी मविआ-बविआने एकत्र यावे!

CD

भाजपविरोधात मविआ-बविआची एकजूट गरजेची!
वसईत काँग्रेस नेते विजय पाटील यांचे स्पष्ट मत
विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यातून भाजपला सत्ताबाह्य करण्यासाठी महाविकास आघाडी (मविआ) आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) यांनी एकत्र यावे, असे मत काँग्रेस नेते व माजी प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी व्यक्त केले. भाजपच्या जातीयवादी विचारसरणीमुळे संविधान व सर्वधर्मसमभाव धोक्यात आल्याने, लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणासाठी ही एकजूट काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वसई (पूर्व) येथील गिरनारधाम येथे झालेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले, “मविआ व बविआने मतभेद बाजूला ठेवून समान कार्यक्रम राबवला, तर विजय निश्चित आहे.” त्यांनी बविआ अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक करत, त्यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे सांगितले.या वेळी बविआ नेते माजी खासदार बळीराम जाधव यांनी “विकसित भारतासाठी राहुल गांधी आणि विकसित महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे आवश्यक आहेत,” असे मत व्यक्त केले. माजी आमदार राजेश पाटील यांनी मविआ-बविआ ही धर्मनिरपेक्ष, परस्परपूरक शक्ती असून, त्यांची एकजूट नैसर्गिक असल्याचे सांगितले.

सभेत मविआ-बविआचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आघाडीच्या तयारीत वसई तालुका ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राम पाटील यांची समन्वयक भूमिका ठळकपणे दिसून आली. माजी सभापती कन्हैय्या बेटा भोईर यांनी आभार मानले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील, कृष्णा माळी, अशोक पाटील, सुनील आचोळकर, रमेश जाधव, प्रदीप पाटील, जयप्रकाश ठाकूर, माजी सरपंच भोईर, पोमणचे सरपंच कमळाकर जाधव, मनिष पाटील, रोहित ससाणे, अश्रफ अली यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनेक आजी माजी सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT