मुंबई

घाटकोपर पूर्वेत मराठी नाट्यगृहाची प्रतीक्षा संपणार?

CD

घाटकोपर पूर्वेतील मराठी नाट्यगृहाची प्रतीक्षा संपणार
महिन्याच्या आत कार्यान्वित करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे निर्देश
निलेश मोरे | घाटकोपर, ता. १३ : मुंबईतील दादर, विलेपार्ले, बोरिवली आणि मुलुंड येथील महानगरपालिकेच्या नाट्यगृहांमुळे मराठी रंगभूमीला उत्तम प्रतिसाद मिळत असताना, त्याच धर्तीवर घाटकोपर पूर्व भागातही मराठी नाट्यगृह सुरू होण्याची गेल्या अनेक वर्षांची चर्चा अखेर प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. २०१७ पासून प्रेक्षकांना केवळ प्रतीक्षा करावी लागत असलेल्या या नाट्यगृहासंदर्भात सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी महत्त्वपूर्ण बैठकीत एक महिन्याच्या आत नाट्यगृह कार्यान्वित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पंतनगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत महानगरपालिकेला हस्तांतरित झालेले नाट्यगृह अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे मराठी रसिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने या नाट्यगृहाच्या दुरुस्तीकरिता एक कोटी रुपयांचे टेंडर काढले होते; मात्र त्यासाठी कोणताही कंत्राटदार पुढे आला नाही. या पार्श्वभूमीवर, घाटकोपर पूर्वेतील मराठी रसिकांच्या वतीने महामंत्री अजय बागल यांनी आशीष शेलार यांना नाट्यगृह सुरू करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपआयुक्त अजितकुमार अंबी, एन वॉर्डचे सहाय्यक आयुक्त डॉ. गजानन बेल्लाळे उपस्थित होते.
.........................
महागडे भाडे
सध्या घाटकोपर पूर्वेतील एका खासगी ट्रस्टच्या ७०० आसन क्षमतेच्या नाट्यगृहात प्रामुख्याने गुजराती नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात; मात्र या नाट्यगृहाचे भाडे ४० ते ५० हजार रुपये असल्याने स्थानिक मराठी संस्थांना तिथे कार्यक्रम घेणे परवडत नाही. यामुळे मराठी टक्का अधिक असूनही घाटकोपर पूर्व-पश्चिम भागात मराठी सांस्कृतिक एकत्रीकरणास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
.........................
अतिक्रमण आणि दुरुस्तीचे आव्हान
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या आणि २४९ आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहाभोवती अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात हातगाड्या, विविध सामान तसेच जनावरे बांधण्यात येतात. एका महिन्यात नाट्यगृह सुरू करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेला लवकरात लवकर दुरुस्तीचे आणि परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे मोठे आव्हान आहे.
.........................
नाट्यगृहाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. लवकरच ते चालवण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. नाट्यरसिकांसाठी हे नाट्यगृह लवकरच सुरू करण्यात येईल.
- डॉ. गजानन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त, एन वॉर्ड
.........................
आमदार पराग शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाट्यगृह सुरू होणार आहे. मराठी रसिकांना नाटकाचा आस्वाद घेता यावा यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मंत्री आशीष शेलार यांनी सर्व अडचणी दूर करून नाट्यगृह कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत.
- अजय बागल, महामंत्री, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live-in Relationship Rule: महत्त्वाची बातमी! लिव्ह-इन रिलेशनशिपबाबतचे नियम बदलले; राज्य सरकारची मोठी घोषणा, नवे नियम काय?

किती गोड! 'दशावतार' पाहिल्यावर चिमुकल्या चाहतीने चित्रपटातील माधवकडे मागितलं हे गिफ्ट; अभिनेता व्हिडिओ करत म्हणतो-

Pune Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूलाजवळ भीषण अपघात! , दोन ट्रकची धडक, कार जळून खाक ; सात जणांचा मृत्यू

DMart : डीमार्टमधली चोरी थांबवण्यासाठी कंपनीने केली भन्नाट आयडिया; तुम्ही चुकूनही या ट्रॅपमध्ये अडकू नका..खरेदीला जाण्यापूर्वी हे बघाच

Latest Marathi Breaking News Live : 252 कोटींच्या ड्रग प्रकरणात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT