मुंबई

महायुतीसह महाविकास आघाडीत फाटाफूट

CD

डहाणू, ता. १५ (बातमीदार) : नगरपरिषदेची निवडणूक लढविण्यासाठी शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यासाठी भाजपविरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येत नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी शुक्रवारी (ता. १४) डहाणू येथे आयोजित पत्रकार परिषदेत, शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन आघाडीची घोषणा केली.

डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होणार असल्याची शक्यता आहे. डहाणूमध्ये महाविकास आघाडीतील चांगले वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने काढता पाय घेतल्यामुळे सध्या शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवारी (ता. १७) या नवीन आघाडीकडून नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून, या वेळीच नगराध्यक्षपदाचा उमेदवार समजणार आहे.

डहाणू नगराध्यक्षपदासाठी भाजपचे भरतसिंग राजपूत हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात महायुतीतील दोन आणि महाविकास आघाडीतील एक पक्ष एकत्र आले आहे. गेल्या काही वर्षांपासून वर्चस्व असलेल्या भाजपच्या एकाधिकारशाहीचे चित्र बदलायचे आहे, असा विश्वास शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी व्यक्त केला आहे. या वेळी तिन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

Sagar Mali Bodybuilder Death : जगाला ताकद दाखवली पण..., आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सागर माळी यांचे निधन, मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT