मुंबई

ज्येष्ठ नागरिकांचा गुणगौरव समारंभ

CD

ज्येष्ठ नागरिकांचा गुणगौरव समारंभ
डोंबिवली, ता. १६ : राजाजी पथ ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्यातर्फे ज्येष्ठांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी गुणगौरव समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विवाहाला ५० वर्षे पूर्ण केलेल्या जोडप्यांचा आणि ७५ वर्षांचा जीवनप्रवास पूर्ण केलेल्या महिला आणि पुरुषांचा सन्मान करण्यात आला. हा समारंभ शुक्रवारी (ता. १४) कुडाळ देशकर सहयोग हॉल येथे झाला. कार्यक्रमाला सुमारे ९० हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर आणि भाजपचे उपाध्यक्ष अमित टेमकर, भाजपचे माजी अध्यक्ष गणेश देसाई, रामनगर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी उमेश कोरडे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. संस्थेचे विद्यमान खजिनदार सुहास नाईक, संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद म्हाडागूत, सचिव शिल्पा सामंत, स्मिता राजे आणि संस्थेचे कार्यकारिणी सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. रवींद्र खानोलकर, सुरेश पालकर, वृंदा कौजलगिकर आणि मिहिर देसाई यांचीही उपस्थिती लाभली. समारंभादरम्यान उपस्थित ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नव्या कार्यकारिणीचा हा पहिला मोठा कार्यक्रम असून, तो आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. समारोपात संस्थेचे अध्यक्ष दिलीप जोशी यांनी सर्व उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Marathi News Live Updates : वैजापुरात कचोरीत उंदराची विष्ठा आढळल्याने खळबळ

Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना

SCROLL FOR NEXT