मुंबई

खारघरमधील सांगितिक कार्यक्रम वादात

CD

खारघरमधील सांगीतिक कार्यक्रम वादात
मद्यपानासाठीची परवानगी नाकारण्याची पत्रातून मागणी
खारघर, ता.१७ (बातमीदार): येथील सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या हिपहॉप फेस्टिव्हलसाठी तात्पुरत्या मद्यपान परवानगी देऊ नये, असे पत्र भाजपचे खारघर शहर उपाध्यक्ष अजित अडसूळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
खारघर येथील सेंटरला पार्कमध्ये २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी रोलिंग राऊंड इंडिया तर्फे हिप हॉप फेस्टिव्हल होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये देश विदेशातील कलाकार येणार असल्याने तरुणांमध्ये उत्साह संचारला आहे. या कार्यक्रमानिमित्त विदेश मद्यविक्री होणार केली जाणार आहे. पण या परिसरातील सेंट्रल पार्क शेजारी इस्कॉन मंदिर, गुरुद्वारा,बंगाली असोसिएशनचा कालीमाता मंदिर आणि सांस्कृतिक केंद्र आणि राघवेंद्र स्वामी मठ अशा धार्मिक ठिकाणांमुळे मद्य विक्रीसाठी दिला जाणारी परवानगीने विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करून तात्पुरता मद्यपान परवानगी देऊ नये, असे पत्र भाजपचे खारघर शहर उपाध्यक्ष अजित अडसूळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाचे नवे दर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल कितीला?

Akola Accident: भीषण अपघातात दाम्पत्याचा अंत; अमरावतीहून मूर्तिजापूरकडे जाताना काळाचा घाला ; तिघेही गंभीर

‘Toxic’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात! स्पीकर स्टँड कोसळला, ४ जण जखमी; यशने थांबवलं भाषण

Marathi News Live Updates : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात कचऱ्यावर उभं राहून मनसेचं आंदोलन

Bhuleshwar Ganesh Idol Collapse Video : भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती कोसळल्याचा VIDEO समोर; मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT