

Bhuleshwar Ganesh Idol Collapse Video mumbai
esakal
Bhuleshwar Ganesh Idol Accident : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनावेळी घडलेल्या भीषण दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ‘भुलेश्वरचा राजा’ या गणेश मंडळाची भव्य मूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान अचानक कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही समावेश आहे. ही घटना शनिवारी (२२ ऑगस्ट) रात्री भुलेश्वरमधील बलराम मर्चंट रोड, जय अंबे चौकाजवळील कबुतरखाना परिसरात घडली.