मुंबई

१४ प्रभागांमध्ये नव्याने फेर आरक्षण

CD

१४ प्रभागांमध्ये नव्याने फेर आरक्षण
पनवेल, ता. १७ (बातमीदार)ः राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पनवेल महापालिकेची फेर आरक्षण सोडत सोमवारी (ता. १७) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. अनुसूचित जाती-जमाती महिला या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणाचा समावेश नसल्याने ही प्रक्रिया पुन्हा राबवावी, असा आदेश आयोगाने दिला होता. त्यानुसार १४ प्रभागांमध्ये फेर सोडत करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, १३, १४, १६, १९, २० या एकूण १४ प्रभागांमध्ये फेर आरक्षण करत नागरिकांचा मागासवर्ग महिला या प्रवर्गातील ६ जागांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सोडतीनंतर अनेक ठिकाणी लक्षणीय बदल झाले आहेत. ज्या प्रभागांत दोन सर्वसाधारण महिला किंवा सर्वसाधारण जागा होत्या, तेथे अदला-बदली झाली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १, २, ८ व १० येथे आरक्षणात बदल स्पष्टपणे जाणवला आहे.
-----------------------
दोन प्रभागांमध्ये बदल
कळंबोली वसाहतीतील प्रभाग क्रमांक आठ आणि दहामध्ये बदल झालेला आहे. या ठिकाणी ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या सोडतीत दोन सर्वसाधारण अशा प्रकारचे आरक्षण पडले होते. त्याचबरोबर एक ओबीसी आणि एक सर्वसाधारण महिला अशी सोडत निघाली होती. आता एक ओबीसी आणि दोन सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT