मुंबई

''शिवबंधन'' बांधण्याची अट अमान्य

CD

‘शिवबंधन’ बांधण्याची अट अमान्य
मनसेच्या संगीता चेंदवणकर अपक्ष म्हणून रिंगणात
बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीत मनसेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीता चेंदवणकर यांनी नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी नाकारून शहराच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी दिली आहे. पक्षाने निवडणूक न लढवण्याचा आदेश दिला असतानाही, महाविकास आघाडीतून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असताना, ‘शिवबंधन’ (ठाकरे गटाचे सदस्यत्व) बांधून पक्षप्रवेश करण्याची अट स्थानिक पातळीवर पुढे आली. ही अट येताच चेंदवणकर यांनी थेट नकार देत, राज ठाकरे यांच्यावरील निष्ठेला प्राधान्य दिले.

२० वर्षे ज्यांच्या मागे उभे आहोत, त्या नेतृत्वाला सोडणे शक्य नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना, महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदासाठी चेंदवणकर यांचे नाव निश्चित केले होते. ठाकरे गटाकडे नगराध्यक्षपद ठेवून उमेदवार मनसेचा असावा, यावर वरिष्ठ पातळीवर सहमती झाली होती आणि मनसेच्या नेतृत्वानेही सकारात्मकता दर्शवली होती; मात्र निर्णायक क्षणी ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी तथा शहरप्रमुख किशोर पाटील यांनी ‘शिवबंधन बांधूनच उमेदवारी मिळेल’ ही अट ठेवली. या अटीवरून संभ्रम आणि मतभेद निर्माण झाले आणि चेंदवणकर यांनी पक्षात जाणार नाही, अशी भूमिका घेत, ही अट अमान्य केली. परिणामी, वरिष्ठ नेत्यांनी केलेले प्रयत्न आणि आघाडीतील एकमत स्थानिक नेतृत्वाच्या अट्टाहासामुळे कोलमडल्याचे चित्र आहे.

राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
बदलापूरच्या प्रश्नांवर आक्रमक आवाज उठवणाऱ्या आणि संवेदनशील आंदोलनांचे नेतृत्व करणाऱ्या चेंदवणकर यांनी शहरात स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार, राजकीय निष्ठा जपून त्यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजकीय निष्ठा आणि नेतृत्वाच्या प्रेमापोटी अधिकृत उमेदवारी नाकारल्याची ही दुर्मिळ घटना बदलापुरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पुढील निवडणुकीचे राजकीय समीकरण पूर्णतः बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Latest Marathi Breaking News : धक्कादायक! 16 वर्षीय भाचीला सख्या मामानं चालत्या लोकलमधून खाली ढकललं

SCROLL FOR NEXT