मुंबई

उन्नत मार्गात अडचणींचा डोंगर

CD

उन्नत मार्गात अडचणींचा डोंगर
सिडकोसमोर भूसंपादन करण्याचे मोठे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : ठाणे ते नवी मुंबई यादरम्यान नवी मुंबई विमानतळाला जोडणारा उन्नत मार्ग सिडकोने तयार केला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारची जमीन विनाशुल्क हस्तांतरित केली जाणार आहे, परंतु उर्वरित भूसंपादनासाठी सिडकोला विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. २५ डिसेंबरला नाताळ सणाच्या सकाळी पहिल्या विमानाचे उड्डाण होणार आहे. पहिल्या टप्प्यात २० लाख प्रवासी वाहतूक नियोजित आहे. ठाणे तसेच नजीकच्या कल्याण, डोंबिवली शहरांतून विमानतळाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे सहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, अर्बन मास ट्रान्झिट कंपनी (युएमटीसी)तर्फे अहवाल तयार करण्यात आला आहे, पण त्यासाठीचे भूसंपादनाचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे.
----------------------------
प्रकल्पातील महत्त्वाचे टप्पे
ः- ठाणे-नवी मुंबई यादरम्यान सहा पदरी उन्नत मार्ग.
- उपनगरातील प्रवाशांना फायदा
- प्रवासात ४० मिनिटांची बचत.
- २५.२ किलोमीटरची लांबी.
- ६ हजार कोटींचा खर्च
---------------------------------
सहा मार्ग जोडणार
उन्नत मार्गामुळे कोपरी पटणी पूल, घणसोली ऐरोली खाडी पूल, कांजूरमार्ग-कोपरखैरणे जोडरस्ता, वाशी येथे शीव-पनवेल महामार्ग, पाम बीच मार्ग आणि उलवे किनारी मार्ग अशा महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या सहा आंतर बदलांद्वारे पश्चिम उपनगरांकडून येणारी वाहतूक विनाअडथळा होणार आहे.
-------------------------------------
२०३० पर्यंत प्रकल्प पूर्ण
उन्नत मार्ग उलवे किनारी मार्ग पुढे उन्नत जोडरस्त्याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनलला जोडला गेला आहे. ठाणे-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्गावरून १०० किलोमीटर प्रती तास वेगाने वाहने धावणार आहेत. २०३० पर्यंत सदर प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे.
-------------------------------------------------
प्रमुख अडथळे
ठाणे ते नवी मुंबई २५ किलोमीटर अंतरादरम्यान वाशी, कळवा, मुलुंड खाडी आहे. या परिसरात कांदळवनांचे मोठे जाळे असल्याने सिडकोला उन्नत मार्गाकरीता खांब उभारावे लागणार आहेत. त्यासाठी वन विभाग, पर्यावरण, सीआरझेड अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याचे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT