मुंबई

आठवडा बाजाराने मनस्ताप

CD

आठवडा बाजाराने मनस्ताप
पनवेल महापालिकेकडून कारवाईचे संकेत
पनवेल, ता. २० (बातमीदार)ः पनवेल पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेकायदा आठवडा बाजारांवर कारवाई केली होती, मात्र पालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा बाजार भरविले जात असल्याने विविध अडचणींना सामोरे जाण्याची वेळ पनवेलकरांवर आली आहे.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बेकायदा आठवडा बाजारांचा विषय विधिमंडळात मांडला होता. त्यानंतर पालिकेने कारवाईचा धडाका लावला होता. आता पुन्हा पालिका क्षेत्रात बेकायदा आठवडा बाजार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि आठवडा बाजारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जारी केले आहेत. अतिक्रमण विभागाकडून पुन्हा एकदा मोहीम राबवून असे बाजार थांबविले जाणार असल्याचा स्पष्ट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
------------------
अधिकृत दुकानदारांचे नुकसान
अधिकृतपणे कर भरणाऱ्या, दुकान चालविणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान बेकायदा बाजारांमुळे होत असल्याची तक्रार वाढत आहे. अधिकृत दुकानदारांना भाडे, कर, वीज आणि इतर शासकीय शुल्क भरावे लागतात; पण अनधिकृत फेरीवाल्यांनुळे त्यांना स्पर्धा निर्माण झाली आहे. तसेच ग्राहकांचा ओढा आठवडा बाजारांकडे वळत असल्याने अधिकृत दुकानदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-----------------
भुरट्या चोरांना अभय
गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरांची चलती असते. मोबाइल, पर्स, रोक रकमेच्या चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्येही असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय अशा आठवडा बाजारांना गावगुडांचा आश्रय असल्याने गुन्हेगारांना ‘अभय’ मिळते, अशा रहिवाशांची तक्रारी आहेत.
-------------
प्लॅस्टिकचा डोंगर
बेकायदा आठवडा बाजारांमध्ये नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात फेरीवाले येतात. बाजार संपल्यानंतर जवळपास टनभर प्लॅस्टिक कचरा जमा होतो. त्याची विल्हेवाट लावण्याचा संपूर्ण भार पनवेल महापालिकेवर पडत आहे, तर दुसरीकडे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर ताण वाढला आहे.
--------------------
महापालिका कार्यक्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत बेकायदा आठवडा बाजारांना परवानगी देण्यात येणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेला, वाहतूक व्यवस्थेला, स्वच्छतेला बाधा पोहोचवणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RuPay Card Changes: RuPay कार्डधारकांना धक्का! 1 एप्रिलपासून नियम बदलणार; PNB-HDFC चा मोठा निर्णय

Pune News: ह्रदयद्रावक घटना! गावाला रस्ता नसल्याने वेळेवर मिळाले नाहीत उपचार, चिमुकल्याचा वाढदिवशीच करुण अंत..

IPL 2026 Marathi News: रोहित शर्मा Impact Player म्हणून खेळणार? सराव सुरू; मुंबई इंडियन्सची Playing XI कशी असणार?

Education Department: शिक्षण विभाग ‘मनोहर’वर मेहरबान; देवळी कला मारहाण प्रकरण, शिक्षकावर कारवाई केव्हा?

HPCL Jobs Alert: सरकारी नोकरीचा बंपर चान्स! डिप्लोमा ते CA उमेदवारांसाठी लाखोंच्या पगारासह HPCL मध्ये 700+ जागा, असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT