मुंबई

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, शिवशक्ती भिम शक्ती पक्षाचा ''संविधान दिन सन्मान सोहळा!

CD

''राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, शिवशक्ती भिमशक्ती''चा
संविधानदिन सन्मान सोहळा!
चेंबूर, ता. २० (बातमीदार) ः भारतीय संविधानदिन सन्मान सोहळानिमित्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष (रारिप), शिवशक्ती भिमशक्ती पक्षाचा ‘संविधानदिन सोहळा’ व भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी संस्थेचा ‘रौप्य महोत्सव सोहळा’ बुधवारी (ता. २६) दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, आमदार तुकाराम काते, माजी नगरसेवक सुनील मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती रारिप-शिवशक्ती-भिमशक्तीचे अध्यक्ष भारत वाघमारे, रारिप संघटक लोकशाहीर वामनराव घोरपडे यांनी दिली आहे. या वेळी लोकशाहीर बलभिम बोंडवे, शाहीर मारूती बर्मा गुंजाळ, शाहीर अमर नवघरे, गायिक मिनाक्षी मोहन थोरात, शाहीर अरविंद वाघमारे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष लोकशाहीर बलभिम बोंडवे, सूत्रसंचालन गोरख माने करणार आहेत. या कार्यक्रमाला कलावंत शाहीर व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रारिप प्रदेश अध्यक्ष सुरेश वाडेकर, महासचिव अशोक भाऊ कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष शीतल तुपे, रारिप मुंबई अध्यक्ष प्रकाश शिवशरण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT