मुंबई

थोडक्‍यात बातम्या सहा

CD

नयन वाघ हिचा आश्रमशाळेत सत्कार
टोकावडे (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील वाल्हिवरे अनुदानित आश्रमशाळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नयन वाघ यांचा भव्य सत्कार करण्यात आला. शुक्रवार, ता. २१ नोव्हेंबर रोजी ढोल-ताशा, लेझीम पथकाच्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. नयन वाघ यांनी अतिशय खडतर परिस्थितीत अभ्यास करून कठोर परिश्रमाच्या जोरावर गुणवत्ता सूचीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात राज्यात १५ वा क्रमांक मिळवत भव्य यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण मुरबाड तालुक्यातही सर्वत्र गौरवाची भावना व्यक्त होत आहे. नयन वाघ यांनी स्वतःच्या जीवनातील प्रेरणादायक अनुभव सांगून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढील काळात आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण खाकर, उपसभापती, अरुणा खाकर, नवसू खाकर बाबा, डॉ. लचका, पुनम वाघ, महेश भोईर, किरण मोहपे, राजेश गोडांबे, रवि अगिवले, रमेश गभाले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
...............
तरुणाला ऑनलाईन एक लाखांचा गंडा
भिवंडी (वार्ताहर) ः तीन महिलांनी संगनमताने भिवंडीतील एका तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून ऑनलाईन पैसे उकळून आर्थिक फसवणूक केल्याची घटना टेमघर गावातून समोर आली आहे. याप्रकरणी तीन महिलांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमीना दिदी, रिया सरकार (दोघी रा. पश्चिम बंगाल), रुस्तम मंडल (रा.भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. रईस जहीर खान ( वय४८) हा व्यापारी टेमघर गावात राहत असून वरील तीन महिलांनी आपसात संगनमताने रईसला लग्नाचे आमिष दाखविले होते. तसेच वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या कारणांसाठी १ लाख ८ हजार ७०० रुपये ऑनलाईनने आपल्या बँक खात्यात गोठवून लग्न न करता रईसची आर्थिक फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रईसने तिन्ही महिलांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी तिन्ही महिलांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
.........
वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावली
भिवंडी (वार्ताहर) ः रस्त्याने घरच्या दिशेने पायी जाणाऱ्या महिलेच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची घटना पद्मानगर मधील एका गल्लीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगव्वा सत्तय्या मिटटापेल्ली (६० रा. पद्मानगर) या वयोवृद्ध महिला २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पद्मानगर येथील मोनिका बार जवळील गल्ली मधून रस्त्याने पायी घरी जात असतानाच त्यांच्या पाठीमागून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील अज्ञात इसमाने आगव्वा यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून दुसऱ्या गल्लीतून पळ काढला आहे. याप्रकरणी अज्ञातावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT