अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
ठाणे, ता. २२ ः मानपाडा उड्डाणपुलावर अनोळखी वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मिरा-भाईंदर येथील ऐनिश ॲपलो लासराडो (वय २५) हा दुचाकीवरून जात असताना एका वाहनाने त्याला धडक दिली. उपचारासाठी त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास कापूरबावडी पोलिस करीत आहेत.