मुंबई

टीओकेचा ‘मास्टरस्ट्रोक’

CD

टीम कलानीचा ‘मास्टरस्ट्रोक’
जमनु पुरस्वानी यांच्याकडे महापालिका निवडणुकीची धुरा
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) ः उल्हासनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी आणि नाट्यमय घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षातील चार प्रभावी नेते टीम ओमी कलानी-शिवसेना (टीओके) आघाडीत सामील झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटली आहेत. या मोठ्या प्रवेशानंतर टीओकेने आणखी एक मोठी खेळी खेळत भाजपमधून आलेल्या जमनु पुरस्वानी यांच्यावर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा संपूर्ण ताबा सोपवला आहे. पुरस्वानी यांची टीओकेचे ‘मुख्य निवडणूक हुकमी एक्का’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उल्हासनगर भाजपमधील चार मोठे नेते जमनु पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखीजा आणि राम चार्ली पारवानी यांनी टीम ओमी कलानी-शिवसेना युतीमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, टीओकेने कलानी महल येथे कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. अध्यक्ष जयराम लुल्ला यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला माजी आमदार पप्पू कलानी, टीओके प्रमुख ओमी कलानी यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

कमिटीत भाजपचे चार चेहरे
बैठकीत आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकांसाठी विस्तृत रणनीती आखण्यात आली. टीओकेने मोठा राजकीय निर्णय घेत जमनु पुरस्वानी यांची टीओकेच्या निवडणूक प्रमुखपदी निवड केली. वरिष्ठ नेत्या नरेंद्र कुमारी ठाकूर यांची सहनिवडणूक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. भाजपमधून आलेल्या चारही दिग्गज नेत्यांना टीओकेच्या कोअर कमिटीतही अधिकृतपणे स्थान देण्यात आले आहे.

३० हजारांची आघाडी शून्यावर
टीओके प्रमुख ओमी कलानी यांनी विश्वास व्यक्त केला, की जमनु पुरस्वानी आणि नरेंद्र कुमारी ठाकूर यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाखाली टीओके यंदाच्या निवडणुका भक्कमपणे लढवून ऐतिहासिक विजय नक्कीच मिळवणार. टीओकेचे मुख्य प्रवक्ता कमलेश निकम यांनी या बैठकीत एक धडाकेबाज घोषणा केली. त्यांनी सांगितले, की टीओकेने दोन विशेष पॅनेल निश्चित केले आहेत, जिथे लक्ष केंद्रित करून निवडणूक लढवली जाईल. या पॅनेलमध्ये असलेल्या ‘दिग्गजांना पराभूत करणे’ हेच टीओकेचे प्राथमिक ध्येय असणार आहे. निकम यांनी कोणत्या दोन पॅनेलचा उल्लेख केला, हे जाहीर न केल्याने उत्सुकता वाढली आहे.

राजकारण नव्या वळणावर
निकम पुढे म्हणाले, जमनु पुरस्वानी यांच्या नेतृत्वाखालीच भाजपने विधानसभा निवडणुकीत ३० हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती आणि आज ते आमच्यासोबत आहेत, म्हणजेच भाजपची ती ३० हजारांची आघाडी आता शून्यावर पोहोचली, असे समजा. भाजपमधून आलेल्या चारही मोठ्या नेत्यांचा समावेश आणि जमनु पुरस्वानी यांच्या हातात निवडणूक सूत्रे यामुळे उल्हासनगरच्या महापालिका निवडणुकांचे राजकारण आता पूर्णपणे नव्या वळणावर आले आहे, हे स्पष्टपणे जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT