मुंबई

अंबरनाथमध्ये नामांकन छाननीत दुहेरी निकष?

CD

अंबरनाथमध्ये नामांकन छाननीत दुहेरी निकष?
ठाकरे गटाचा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पक्षपाती कारभारावर गंभीर आरोप
अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या नामांकन छाननी प्रक्रियेवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पक्षपाती कारभार केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. शहरप्रमुख ॲड. संदीप पगारे यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर अन्याय झाल्याचे सांगत याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

प्रभाग ७-अ मधील ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार सोनाली नितीन इनकर यांचा नामांकन अर्ज उमेदवार व सूचक यांच्या स्वाक्षरी नसल्याचे कारण देत अवैध ठरवण्यात आला. विशेष म्हणजे छाननीवेळी कुणीही हरकत घेतली नव्हती, असे पगारे यांनी सांगितले. याच प्रभागातील काँग्रेसच्या उमेदवार मनीषा गोडसे यांच्या अर्जातही स्वाक्षऱ्या नाहीत, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. गोडसे यांच्या अर्जात जात प्रवर्ग ‘मांग गारुडी’ नमूद असताना जोडलेल्या जात प्रमाणपत्रात ‘हिंदू महार’ असा उल्लेख असल्याचेही ठाकरे गटाने निदर्शनास आणून दिले.

उमेदवार सोनाली इनकर आणि परशुराम नकवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या अर्जातील विसंगतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे तक्रार नोंदवली असून, कारवाई न झाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा ॲड. पगारे यांनी दिला. या वेळी ॲड. संदीप पगारे, युवासेनेचे रोहित पोळ, अंबरनाथ सचिव सुदन्यान मेहबूबानी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आरोपांचे खंडन
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मनीषा गोडसे यांनी ठाकरे गटाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या आणि सूचकाच्या स्वाक्षऱ्या अर्जावर आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, की त्या समाजसेविका म्हणून काम करीत असल्याने अनेक पक्षांकडून त्यांना संधी होती आणि त्यांनी शिवसेनेसह काँग्रेसमधूनही अर्ज भरला होता. गोडसे यांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जात असून, काँग्रेसचा अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी गटाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT