मुंबई

बी. एचएमसीटी आणि बीसीए, बीबीए, बीएमएसबीबीएमसाठी एकच सीईटी

CD

वर्ष २०२६-२७साठी एकच सामाईक सीईटी
अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध

मुंबई, ता. २४ : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या अनेक सीईटी परीक्षांमध्ये बदल केले जात आहेत. विविध प्रकारच्या सीईटींना विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी. एचएमसीटी आणि बी. बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या दोन स्वतंत्र सीईटी परीक्षांऐवजी एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीईटी सेलने या परीक्षेला एमएएच-बी. एचएमसीटी/ बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम- सीईटी २०२६ असे नामकरण केले असून त्यासाठीची माहितीही आपल्या संकेतस्थळावर जारी केली आहे. एमएएच-बी. एचएमसीटी/ बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता समान असल्यामुळे एकत्रित सीईटी परीक्षा घेणे सर्व उमेदवारांसाठी योग्य व लाभदायक ठरेल, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. तसेच एमएएच-बी. एचएमसीटी/ बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम- सीईटी २०२६चा परीक्षा कालावधी १२० मिनिटे राहील, असे निश्चित करण्यात आले आहे. संबंधित सीईटीचा अभ्यासक्रम सर्व संबंधितांना माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, याची सर्व उमेदवार, पालक आणि सहभागी संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT