मुंबई

उल्हासनगरात मध्यरात्री गुन्हेगारीला चाप

CD

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : उल्हासनगरात मध्यरात्री गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ची धडाकेबाज अंमलबजावणी केली. २२ ते २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दोन तास चाललेल्या या व्यापक कोम्बिंग ऑपरेशनमध्ये प्रभाग-४ परिसराला पोलिसांनी घेरला होता. पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २२५ अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. गुन्हेगारी, नशा, तंबाखू, गुटखा, जुगार अशा विविध अनियमिततेवर मोठी कारवाई केली.
शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर मजबूत पकड ठेवण्यासाठी उल्हासनगर पोलिसांनी २२ नोव्हेंबरच्या रात्री १० ते १२ या वेळेत झोन-४ परिसरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले.
गुन्हेगारांची हालचाल रोखणे, अड्ड्यांवर धडक कारवाई करणे आणि नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणे हा या मोहिमेचा हेतू होता. विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोम्बिंग ऑपरेशन पार पडले. यात ४१ अधिकारी, १८४ अमलदार अशा एकूण २२५ कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी धडक कारवाई केली. उल्हासनगर पोलिसांच्या कडक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे शहरात सुरक्षा व सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. गुन्हेगारी विरोधातील हा दमदार उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्याचा निर्धार पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


गुन्ह्यांत दिलेल्या नोटिसा
प्रोहिबिशन - ८
जुगार - १
एनडीपीएस (सेवन) - ५
कोप्टा (तंबाखू) - ७
जारी वॉरंट - ७
एमपी कायदा १४२ - १
गुटखा प्रकरण - १ (अटक)

महत्त्वाच्या तपासण्या
लॉज व बार तपासणी – ८२ (अनियमितता आढळली नाही)
हिस्ट्रीशीटर / हुडदंगखोर तपासणी – ९१ (अनियमितता आढळली नाही)

वाहतूक तपासणी
ऑपरेशनदरम्यान एकाच वेळी शहरातील महत्त्वाच्या आठ ठिकाणी नाका बंदी
१८१ वाहनांची तपासणी
३७,५००/- दंड वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT