मुंबई

धार्मिक कार्यांसाठी उद्या शुभदिवस

CD

धार्मिक कार्यांसाठी उद्या शुभदिवस
मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात, बाजारपेठा सजल्या
नेरूळ, ता.२५ (बातमीदार)ः धार्मिक कार्यासाठी शुभदायी असलेला मार्गशीर्ष महिना गुरुवारपासून सुरू होत आहे. याकाळात देवीच्या आराधना करण्यासाठी महिलांकडून व्रतवैकल्य केली जातात. यानिमित्ताने पूजा आर्चासाठी लागणाऱ्या साहित्याने नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत.
नवी मुंबईत व्रतवैकल्यासाठी लागणारे साहित्य दुकानदारांनी सजवले आहे. तयार मुखवटे, साडी, हिरव्या बांगड्या, गजरे, नथ, पूजेसाठी लागणारे साहित्य आले आहे. मार्गशीर्ष दोन दिवसांवर आल्याने खरेदीकडे महिलांचा कल आहे. घरोघरी देवीचे घट बसवले जातात. महिनाभर देवीची पूजा आरती केली जाते. यावर्षी बाजारात मार्गशीर्षच्या पूजेसाठी लागणाऱ्या विविध साड्या विविध रंगात उपलब्ध आहेत. देवीची मुखवटे अत्यंत देखणे व सुबक बाजारात आहेत. तुळजापूरची भवानी, एकविरा देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी अशा विविध स्वरूपात देवीचे मुखवटे बाजारात आलेले आहेत.
-------------------------
प्रकार सध्याचे भाव
साडी - १०० ते १५० रुपये
नारळ - ४० ते ५० रुपये
बांगड्या - ६० रुपये डझन
देवीचे मुखवटे - २०० ते ३००
महालक्ष्मी पुस्तक -२० रुपये
चोळी - ४० ते १०० रुपये
सुवासिक अगरबत्ती - ४०० रुपये
कपडा - २० रुपये
वेणी - ३० रुपये
देवीचे दागिने - ३० ते ३०० रुपये
----------------------------
मार्गशीर्ष व्रतासाठीचे साहित्य आणून ठेवले आहे. देवीच्या तयार मुखवट्यांना महिलांकडून अधिक पसंती दिली जात आहे.
- गणेश सपकाळ, दुकानदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रातील मंत्र्यांचं 'मुंबई'बाबत धक्कादायक विधान, राज ठाकरे संतापले! मोदी सरकाचे मंत्री असं काय म्हणाले?

Pune Weather Update : पुण्यात थंडीची लाट ओसरली! किमान तापमान 15 ते 20 अंशावर स्थिर; पुढील दोन दिवस हवामान निरभ्र राहणार

Akola Accident: समृद्धी महामार्गाचा रिंग रोड बनला मृत्यूचा सापळा; दुचाकी अपघातात चांगेफळ येथील एक गंभीर

Latest Marathi News Live Update :पुण्यात कोयता गँगची काढली पोलिसांनी धिंड

Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका थांबेना... गरवारे कॉलेज चौकात मध्यरात्री भीषण धडक; तीन जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT