मुंबई

कळव्यातील "संविधान स्तंभा"ची दुरावस्था !

CD

कळव्यातील संविधान स्तंभाची दुरावस्था
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ः नागरिक संतप्त
कळवा, ता. २५(बातमीदार) ः संपूर्ण देशात बुधवारी (ता. २६) भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशात, मात्र कळवा पारसिक नगर रेतीबंदर नाका येथील चौकातील संविधान स्तंभाच्या स्मारकाची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
एकीकडे संविधान दिन साजरा होत असताना रेतीबंदर नाका येथील चौकातील संविधान स्तंभाच्या स्मारकाची अवस्था दयनिय झाली आहे. या स्मारकाच्या पायऱ्याच्या फरश्या निघाल्या असून खालील बांधकाम खचले आहे. तसेच, स्मारकाच्या भोवताली गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्मारकाखालीच प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कागद अशा स्वरुपाचा कचराही पडला आहे. स्मारकाच्या या अवस्थेवरुन नागरिकांनी पालिकेवर रोष व्यक्त केला असून तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. तर, या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांकडून होत आहे.

महापालिका प्रशासन या संवेदनशील प्रश्नावर डोळेझाक करते. ही भारतीय लोकशाहीची विटंबना आहे. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.
- गोपाळ रावराणे, रहिवासी पारसिक नगर

ही बाब अतिशय गंभीर असून या संविधान स्तंभाच्या खालील कचरा तातडीने साफ करण्याचा आदेश दिला आहे.
- ललिता जाधव, सहायक आयुक्त कळवा प्रभाग समिती,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

SCROLL FOR NEXT