ब्रह्मदेव लस्करेच्या प्रयत्नांना पाठबळ
लातूरच्या युवकाला देवीदास चौगुले प्रतिष्ठानची मदत
वाशी, ता. २६ (बातमीदार) ः इच्छाशक्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, या उद्देशाने देवीदास चौगुले प्रतिष्ठान कार्यरत आहे. या संस्थेने लातूर येथील वडार समाजातील ब्रह्मदेव लस्करेला स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक मदत केली आहे.
जन्मतःच हात नसलेल्या ब्रह्मदेव लस्करेने धैर्य, आत्मविश्वास, कठोर परिश्रमाच्या शिक्षणाचा प्रवास करत आहे. अपंगत्व असताना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मोबाइलच्या मदतीने अभ्यास, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याच्या निर्धाराने पुढे जात आहे. सरकारी सेवेत अधिकारी बनून समाजात बदल घडवण्याचे त्याचे स्वप्न आहे; परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने स्पर्धा परीक्षेसाठीची शिकवणी, निवास तसेच जेवणाचा खर्च परवडत नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे देवीदास चौगुले प्रतिष्ठान, ॲड. साहिल चौगुले यांनी ब्रह्मदेवच्या क्षमतेची दखल घेत त्याला मदतीचा हात पुढे केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.