मुंबई

मलप्रक्रिया केंद्रातील ध्वनी प्रदूषणावर तोडगा

CD

मलप्रक्रिया केंद्रातील ध्वनिप्रदूषणावर तोडगा
ब्लोअर बदलण्याचा पनवेल महापालिकेचा निर्णय
कामोठे, ता. २६ (बातमीदार) : कामोठे सेक्टर ३२ येथील मलप्रक्रिया केंद्रातील ब्लोअरमधून निर्माण होणाऱ्या तीव्र आवाजामुळे परिसरातील नागरिकांना अनेक महिन्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागत होता. या ध्वनिप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने या केंद्रातील जुने ब्लोअर बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, संपूर्ण प्रकल्पाच्या सक्षमीकरणासाठी सुमारे ४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
या विषयाबाबत स्थानिक नागरिक उमेश गायकवाड यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मलप्रक्रिया केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली आणि लवकरच ब्लोअर बदलण्यात येतील, असे आश्वासन नागरिकांना दिले होते. सद्य:स्थितीत हे ब्लोअर सांडपाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक हवा पुरवण्याचे काम करतात. मात्र हे यंत्र जुने झाल्याने त्यांच्या आवाजाची तीव्रता वाढली असून, सेक्टर १७ आणि १८ मधील रहिवाशांना त्याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. पनवेल महापालिकेने ८५ एमएलडी क्षमतेचा हा मलप्रक्रिया प्रकल्प २० मार्च २०२५ला सिडकोकडून अधिकृतपणे ताब्यात घेतला आहे. सध्या या केंद्रात २१ कर्मचारी कार्यरत असून, दररोज सुमारे ५० एमएलडी सांडपाणी शुद्धीकरण केले जाते. तसेच नियमितपणे प्रयोगशाळेत पाण्याची गुणवत्ता तपासली जात आहे. यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवर सातत्याने नियंत्रण ठेवले जाते. महापालिकेने या केंद्राच्या अद्ययावतीकरणासाठी उपाययोजना सुरू केल्या असून, निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर ब्लोअर बदलण्याचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: 'एचपी गॅस'कडून निवेदन; देशात गॅसची काय परिस्थिती? स्पष्ट सांगितलं

राजघराण्याशी संबंध, अनुभवी राजकारणी, भाजपचा प्रमुख चेहरा अन्...; महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मांचा राजकीय प्रवास काय?

Horoscope News : उद्या 11 मार्च बुधादित्य योगामुळे 6 राशींना मिळणार विशेष लाभ ! नव्या संधी आणि आर्थिक लाभ

महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रसूती रजा वाढवली; अतिरिक्त अर्ध-पगारी सुट्टीही मिळणार, किती दिवसांची?

T20 World Cup : अहमदाबाद में जितना जरूरी था, आपको तो पता ही हैं! सूर्यकुमार यादव मुंबईत येताच काय म्हणाला बघा Video Viral

SCROLL FOR NEXT