मुंबई

ठाणे जिल्ह्याची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल

CD

ठाणे जिल्ह्याची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल
१५ हजारपैकी १३ हजार वैयक्तिक शौचालय पूर्ण
सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. २६ : ठाणे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. परिणामी, ठाणे जिल्ह्याची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १५ हजार २१४ वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १३ हजार ६४२ वैयक्तिक शौचालय पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि कल्याण या पाच तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये लोकांमध्ये जाऊन वैयक्तिक स्वच्छतेबाबात माहिती देवून जनजागृती अभियान राबविण्यात आले. या जनजागृतीमुळे वैयक्तिक लाभाच्या शौचालयांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यात कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडी या तालुक्यांतील बहुतांश भाग हा शहरी झाल्यामुळे व ग्रामीण भाग कमी असल्यामुळे तालुके शंभर टक्के हागणदारी मुक्तही झाले होते. मात्र, अनेकदा विभक्त कुटुंबीय पद्धतीमुळे वैयक्तिक शौचालयांच्या संख्येत वाढ होत असते. त्यामुळे २०२० ते २०२५ या कालावधीत १५ हजार २१४ ऑनलाईन अर्ज शौचालयांसाठी प्राप्त झाले. त्यापैकी १३ हजार ६४२ वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण झाले असून त्यांचे फोटो देखील वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. तर, एक हजार ५७२ शौचालयांचे काम प्रगती पथावर असून मार्च अखेरपर्यंत या शौचालयांची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयाचे महत्वाबाबत केलेली जनजागृती यामुळे ठाणे जिल्ह्याची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

काय आहेत निकष?
१. प्रत्येक कुटुंबाला शौचालय
२. बाजार परिसर सार्वजनिक शौचालय
३. शाळा, अंगणवाडी, रुग्णालये आदी ठिकाणी शौचालयांची व्यवस्था
४. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनचे काम पूर्ण

शौचालयांची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका उद्दिष्टे पूर्ण अपूर्ण
अंबरनाथ २५७० २४७३ ९७
भिवंडी ३५०२ ३१२८ ३७४
कल्याण १२६२ ११६८ ९४
मुरबाड २९६६ २३६९ ५९७
शहापूर ४९१४ ४५०४ ४१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT