मुंबई

हातावर नंबर गोंदला होता म्हणून तरुणीला मिळाले कुटुंब

CD

हरवलेल्या तरुणीला सुखरूप कुटुंबीयांकडे
पोलिसांची तत्परता; हातावर गोंदलेल्या नंबरमुळे तासाभरात शोध
ठाणे शहर, ता. २६ (बातमीदार) ः वर्तक नगर पोलिस, महानगर पालिका आणि ठाणे सिटीझन्स फाउंडेशनने एका तरुणीला नवे जीवदान दिले आहे. बोलता येत नसलेली व मानसिक संतुलन हरवलेली ही तरुणी वर्तक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री एकटीच भटकत होती. मात्र, पोलिसांनी तासाभरात तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिला सुखरूपणे त्यांच्या स्वाधीन केले. ती तरुणी पेणमधील असल्याचे समजते.
वर्तक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक तरुणी (ता. २५) रात्री संशयस्पदरित्या फिरत असल्याची माहिती दक्ष नागरिकाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता तिला व्यवस्थित बोलता येत नसल्याचे आणि तिचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे प्राथमिक चौकशी दिसून आले. पोलिसांनी तिची शासकीय रुग्णालयात तपासणी करून तिच्याशी अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तिच्याकडून तिच्या कुटुंबियांची काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध लागेपर्यंत तिला महिला आधार केंद्रात ठेवण्यासाठी ठाणे सिटीझन्स फाउंडेशनला कळवले असता त्यांनी पालिकेच्या उपायुक्त अनघा कदम यांच्याशी संपर्क करून बेघर निवासात ठेवण्याची व्यवस्था केली.

पेणमधून झालेली बेपत्ता
पोलिसांनी तिच्या जवळील बॅगची झडती घेतली असता यामध्ये चिट्ठी, मोबाईल असे काहीच आढळून आले नाही. परंतु, तिच्या हातावर अस्पष्ट अंकात मोबाईल नंबर गोंदलेला दिसून आला. त्यावर त्यांनी संपर्क केला असता तिच्या कुटुंबीयांचा शोध लागला. ही तरुणी रायगड जिल्ह्यातील पेण येथे राहणारी होती. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून दिला सुखरूपपणे त्यांच्या स्वाधीन केले. तरुणीचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्यामुळे कुटुंब आणि तिच्या हातावर मोबाईल क्रमांक गोंदला आहे. यामध्येही ही तरुणी अशाच प्रकारे घरातून परराज्यात गेल्याची घटनाही घडली होती. मात्र, तेव्हाही याच पद्धतीने तिचा शोध घेण्यात आला होता, असे पोलिस उपनिरीक्षक सुहास राणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

"आई आगीत होरपळलेली आणि मला लीड रोल मिळाल्याचा फोन आला" शुभविवाह फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Dhule Bus Stand : धुळ्यातील एसटी प्रवासाचा कायापालट! चार स्थानकांचा 'एअरपोर्ट' सारखा विकास, ९० नवीन बसेस दाखल

Video Viral: जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाजांमधला उस्मान तारिक; फेकाड्या पाकिस्तानी गोलंदाजासोबत जस्सीची बरोबरी

वागळे की दुनिया फेम भारती आचरेकरांचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण ! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचा प्रोमो चर्चेत

SCROLL FOR NEXT