शहापूरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या
शहापूर, ता. २६ (वार्ताहर) ः शहरालगतच्या चेरपोली गावाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. अर्धवट जळलेल्या व मृतदेहावर दगड रचून ठेवण्यात आले आहेत. कुजलेल्या अवस्थेत एका ३० ते ४० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह नाशिक-मुंबई महामार्गावर चेरपोली गावच्या हद्दीत आढळला आहे. पोलिसांना हत्येचा संशय असल्याने याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.