मुंबई

मालवणीत साचले कचऱ्याचे डोंगर

CD

मालवणीत कचऱ्याच्या डोंगरामुळे आरोग्य धोक्यात!
मालाड, ता. २६ (बातमीदार) : मालाड पश्चिमेकडील मालवणी, गेट क्रमांक ७ येथील शौचालयाजवळ तब्बल पाच ते सहा फूट उंचीचे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्लॉट क्रमांक ४, नवीन कलेक्टर कंपाऊंड येथे शौचालय बांधल्यानंतर कंत्राटदाराने मलबा न उचलल्यामुळे कचरा साचण्यास सुरुवात झाली. कालांतराने नागरिकांनी टाकाऊ वस्तू टाकल्याने हा कचरा प्रचंड वाढला. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे तीव्र दुर्गंधी, घाण, डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रहिवाशांना शौचालयात जाण्यासाठीही वाट शोधावी लागत आहे. डासांमुळे आजारांचा धोका वाढला असून, उंदीर व घुसांच्या त्रासाने घरात सामानाचे नुकसान होत आहे.
स्थानिक रहिवासी तारीख शेख यांनी पालिकेच्या हेल्पलाइनवर अनेक तक्रारी केल्या, मात्र पालिकेकडून केवळ नाममात्र कचरा उचलला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ या कचऱ्याचा डोंगर पूर्णपणे हटवून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

आजचे राशिभविष्य - 10 मार्च 2026

अग्रलेख : ‘सूर्या’ची पिल्ले!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मार्च 2026

नीज येईना...

SCROLL FOR NEXT