मुंबई

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ठाण्यात अडथळ्यांची शर्यत

CD

ठाण्याच्या सुरक्षा कवचला विलंब
स्थानिक संस्थांच्या अडथळ्यांमुळे काम मंदावले ः मुदत वाढणार
पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हाती घेतलेल्या ५७० कोटी ३० लाख रुपयांच्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. चार परिमंडळांत एकूण सहा हजार ५९ कॅमेरे बसविण्याचे उद्दिष्ट असताना, आतापर्यंत अवघे दोन हजार २०० कॅमेरेच बसविण्यात आले आहेत. हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता तीन महिन्यांनी पुढे ढकलली जात आहे.
ठाणे शहरापासून भिवंडी, उल्हासनगर, वागळे इस्टेट या चार परिमंडळातील ५७० कोटी ३० लाख खर्चून एक हजार ९९७ ठिकाणी दोन हजार १३९ पोलवर एकूण सहा हजार ५९ इतके सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु, या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत कॅमेरे बसविण्यासाठी फ्लोटिंग, महावितरण मीटर ऑनलाईन प्रक्रिया आणि एसटीक्यूसी प्रमाणपत्र हे अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातून मार्ग काढत अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याच्या कामांना मध्यंतरी गती मिळाली खरी. आतापर्यंत दोन हजार १९८ कॅमेरे बसून कार्यान्वित झाले आहेत. मार्च २०२६ ही कामे पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत आता पुढे जात आहे. पण, त्या कामाचा किंचितही खर्च वाढणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन तासांचा इनवेटर बॅकअप
सीसीटीव्ही लावलेल्या ठिकाणी लाईट मीटर दोन तासांच्या इनवेटर बॅकअप केलेली आहे. त्यामुळे बत्तीगुल झाली तरी, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे दोन तास सुरू राहतील अशी व्यवस्था आहे. त्यामुळे तेथील फुटेज कॅमेऱ्यामधील एसडी कार्डमध्ये जमा होऊन पुढे सेंटरला जाईल, असा दावा संबंधित कंपनीने केला आहे.

बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तक्ता
परिमंडळ सीसीटीव्ही कॅमेरे
ठाणे शहर ३१२
वागळे इस्टेट २३८
भिवंडी १,१७३
उल्हासनगर ४७५

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायरिंगसाठी ठाण्यात रस्त्यांवर फ्लोटिंग केल्यावर तो पुन्हा जैसे थै करून द्यायचा असतो. पण, ते काम करून देणारा ठेकेदार तितका सक्षम नाही. तो दिवसाला २०० मीटरच काम करु शकतो. त्यातच आता कॅमेऱ्यांसाठी एसटीक्यूसी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया दिल्लीत होते. याशिवाय त्यासाठी लागणारी लाईट मीटर मंजूरीची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ती डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कॅमेरे बसविण्यास उशीर होत आहे.
- प्रदीप कन्नलू, सहायक पोलिस आयुक्त, सायबर सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT