मुंबई

डोंबिवलीत वैश्य समाजाचे स्नेहसंमेलन संपन्न

CD

डोंबिवलीत वैश्य समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात
डोंबिवली, ता. ३० ः येथील वैश्य समाज संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. समाजातील सर्व बंधू-भगिनींच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली होती. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिरगाव येथील कोकणस्थ वैश्य समाज विद्यमान अध्यक्ष गणपत शेट्ये, विद्यमान चिटणीस जागृती गांगण, मेघना थरवळ, संदीप गांधी, कार्याध्यक्ष राजाराम सोष्टे, विकास कोलते आदी मंडळी उपस्थित होती. डोंबिवली वैश्य समाज संस्थेचे अध्यक्ष अशोक हेगिष्टे यांच्याबरोबरच विश्वस्त गोविंद म्हाडगुत, कार्याध्यक्ष राजाराम सोष्टे, खजिनदार भानुप्रताप नारकर, चिटणीस विवेक हेगिष्टे आदी मंडळींनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेचे विश्वस्त संजय काळोखे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. त्यानंतर जीवन गौरव पुरस्कार पांडुरंग पावसकर यांना, उद्योग भूषण पुरस्कार प्रमोद गांधी यांना तर पूजा तोडकरी यांना हिरकणी पुरस्काराने गौरविण्यात आले.
महिला कलाकारांनी या वेळी नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्यांच्या कार्यक्रमामुळे वातावरण उत्साहित झाले होते. मोहंमद अयाज आणि गायिका करिश्मा आठवले यांनी हिंदी व मराठी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम सादर केला. शिवाय आफ्टर ओएलसी या मराठी चित्रपटाचे निर्माते दीपक राणे आणि अभिनेत्री अश्विनी चवरे यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पूर्वा तोडकरी, सचिन रेडीज, नेहा नारकर, स्नेहल कामेरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. विविध उपक्रमांनी सजलेला हा सोहळा वैश्य समाजाच्या ऐक्य आणि स्नेहबंधाचा सुंदर अनुभव देऊन गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुस्तकांच्या दुकानातून ₹३,००० कोटींचे साम्राज्य! गलगोटियास विद्यापीठाची स्थापना कुणी आणि कशी केली? वाचा सुनील गलगोटियांची कहाणी

Washim Mass Copying Case : वाशिममधील सामूहिक कॉपी प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून २७ जणांवर गुन्हे दाखल!

Mumbai News: अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी तडजोड नाही, आयएनएस शिक्राजवळील इमारतीचे काम थांबविण्याचे आदेश

T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

SCROLL FOR NEXT