मुंबई

नवी मुंबईत ‘डिप क्लिनिंग’ मोहीम सुरू

CD

नवी मुंबईत ‘डिप क्लिनिंग’ मोहीम सुरू
वर्दळीच्या मुख्य रस्त्यांसह एमआयडीसी क्षेत्राकडे विशेष लक्ष
सकाळ वृतसेवा
नवी मुंबई, ता. २७ : नवी मुंबई शहरातील वाढत्या वायुप्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने ‘डिप क्लिनिंग’ अर्थात सखोल स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ठोस आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत शहरातील वर्दळीचे मुख्य रस्ते तसेच एमआयडीसी क्षेत्रातील प्रमुख मार्ग प्राधान्याने स्वच्छ करण्यात येत आहेत. ठाणे–बेलापूर मार्ग, आम्र मार्ग, तसेच औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या कडेला साचलेली माती आणि धूळ पहिल्यांदा वायर ब्रश झाडू आणि फ्लिपर मशीनच्या साहाय्याने एकत्र केली जात आहे. ही माती तत्काळ उचलून वाहून नेण्यात येत आहे. रस्ते स्वच्छ झाल्यानंतर यांत्रिकी टॅंकर, स्प्रिंकलर आणि जेट स्प्रे वाहनांच्या सहाय्याने पाणी मारून रस्ते धुतले जात आहेत. त्याचबरोबर गर्दीच्या चौकांमध्ये ‘एनकॅप’च्या डस्ट सप्रेसर (फॉगर) वाहनांद्वारे हवेत पाण्याचे फवारे मारून हवेत तरंगणारे धूलिकण खाली बसवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या कामासाठी मलप्रक्रिया केंद्रातून शुद्ध केलेल्या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करण्यात येत आहे. आज तुर्भे विभागातील साऊथ सेंट्रल रोड, घणसोली येथील साऊथ फीडर रोड, महापे–कोपरखैरणे रस्ता यासह इतर प्रमुख मार्गांवर सखोल साफसफाई करण्यात आली. हिवाळ्यामुळे हवेत धूर आणि धुळीचे प्रमाण वाढत असल्याने ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
................
दक्षता पथकांची करडी नजर
बांधकाम साईट्स, दगडखाणी आणि आरएमसी सिमेंट प्लांट्समधून होणाऱ्या धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात अभियंते, स्वच्छता अधिकारी व निरीक्षकांचा समावेश असलेली दक्षता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही मोहीम पुढील काळात नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असून, क्षेत्रीय पातळीवर धूळ प्रतिबंधक उपाययोजनांवर काटेकोर लक्ष दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT