मुंबई

विक्रमगड पोलिसांची कारवाई दमन बनावटीचा दारूचा पकडला कंटेनर

CD

दमन बनावटीचा मद्यसाठा जप्त
विक्रमगड पोलिसांची मोठी कारवाई

विक्रमगड, ता. २८ (बातमीदार)ः विक्रमगड तालुक्यात दादडे हद्दीत पोलिसांना मद्य वाहतुकीसंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रमगड हद्दीत सापळा रचत कंटेनरची तपासणी केली. कंटेनरमध्ये सुरुवातीच्या भागात पॅकिंगसाठी वापरण्यात आलेल्या टेपचे खोके व आतल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दमण बनावटीची दारू आढळली. हा कंटेनर विक्रमगडच्या दिशेने येत असताना तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कंटेनरचा चालक पोलिसांना पाहून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कारवाईत कंटेनरसह विविध ब्रँडच्या दमन बनावटीच्या मद्याचे ३९५ बॉक्स जप्त करण्यात आले असून, सुमारे ११ लाख २० हजार ४०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दमन दारू जप्त करण्याची घटना घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईत पीएसआय रमेश बेलकर यांच्यासह हवालदार सुनील पाटील, शिवाजी भोईर, साईनाथ तांबडी, उत्तम बिरारी, पोलिस नाईक मनोज चौधरी, पोलिस शिपाई मयूर तरसे, पोलिस नाईक सुशील बांगर, पोलिस शिपाई चेतन मोहडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
.................................
माहितीच्या आधारे आम्ही कंटेनर तपासला असता आम्हाला या कंटेनरमध्ये दमन बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. हा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजित गोळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT