मुंबई

अजित पवार गटाचा ''बदलापूर मॉडेल''

CD

अजित पवार गटाचे ‘बदलापूर मॉडेल’!
महिलांना उमेदवारीत तब्बल ९० टक्के प्राधान्य

बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : बदलापूर पालिका निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली असताना, राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिलेल्या उमेदवारीने शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या महायुतीत राष्ट्रवादीला मिळालेल्या आठ जागांपैकी तब्बल सहा उमेदवार हे पूर्णपणे शून्य राजकीय पार्श्वभूमी असलेले आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. या ‘बदलापूर मॉडेल’ची सर्वात खास गोष्ट म्हणजे पक्षाने महिला उमेदवारांना ९० टक्के इतकी मोठी संधी दिली आहे. ५० टक्के आरक्षणापेक्षा जवळजवळ दुप्पट महिलांना उमेदवारी देऊन पक्षाने महिला प्राधान्याचा ठाम संदेश दिला आहे.

प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशीष दामले यांनी महिलाच स्थानिक प्रश्न अधिक संवेदनशीलतेने ओळखू शकतात, या विश्वासाची पुनरावृत्ती आम्ही केली आहे, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या एकूण आठ उमेदवारांमध्ये केवळ दोनच उमेदवार राजकीय अनुभव असलेले आहेत, तर उर्वरित सहा चेहरे पूर्णपणे नवखे आहेत.

प्रभाग क्रमांक १ ब मधून प्रभाकर पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. ते अनुभवी माजी नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक ६ अ मधून प्रियांका आशीष दामले यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांना राजकीय अनुभव आहे. प्रभाग क्रमांक १ अ मध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षणातून नीलम गजानन जाधव यांना संधी देण्यात आली आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी शून्य आहे. प्रभाग क्रमांक ४ ब (सर्वसाधारण खुला वर्ग)मधून सामान्य गृहिणी असलेल्या भारती राम लिये यांना उमेदवारी मिळाली असून, त्यांची पार्श्वभूमी शून्य आहे. प्रभाग क्रमांक ५ अ (सर्वसाधारण महिला)मधून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सुगंधा राजेश पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ५ ब (अनुसूचित जाती खुला वर्ग)मधून भीमनगरमधील सर्वसामान्य कुटुंबातील हर्षाली प्रदीप गायकवाड यांना पक्षाने संधी दिली आहे. तसेच प्रभाग क्रमांक ९ ब (अनुसूचित जाती खुला वर्ग)मधून संजू अहिवळे हे नवखे, सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक २४ अ (सर्वसाधारण महिला)मधून वैशाली दिनेश धुमाळ या सामान्य कुटुंबातील महिलेला उमेदवारी मिळाली आहे.

मतदारांचा कौल कोणाला?
एकीकडे इतर पक्षांच्या यादीत पारंपरिक बालेकिल्ले आणि जुने नेटवर्क दिसत असताना, राष्ट्रवादीची यादी सर्वसामान्य महिला, आदिवासी, दलित आणि नवख्या उमेदवारांनी सजलेली आहे. कॅप्टन आशीष दामले आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या समन्वयातून तयार झालेल्या या उमेदवारी यादीमुळे शहरात उत्सुकता वाढली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी हा प्रयत्न चर्चेत असला, तरी अखेर मतदार या प्रयोगात्मक उमेदवारांवर विश्वास दाखवतात की अनुभवी मक्तेदारालाच पसंती देणार, याचे उत्तर २ डिसेंबरच्या मतदानातून मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT