मुंबई

चॉकलेटचे आमिष दाखवत लहान मुलींच्या कानातील पळवणारी टोळी कळव्यात सक्रिय

CD

लहान मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून कानातले चोरले
कळवा परिसरातील घटना; महिला टोळी सक्रिय असल्याचा संशय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः ठाण्याच्या कळवा परिसरात घराबाहेरील अंगणात खेळणाऱ्या लहान मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवले जात आहे. त्या मुलींच्या कानातील सोन्याची रिंग काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हे दागिने महिला काढत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याने कळव्यात महिला टोळी सक्रिय झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी घोलाईनगर येथे राहणाऱ्या सुनीता दळवी यांनी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांची लहान पाचवर्षीय मुलगी आणि शेजारील सहावर्षीय मुलीला अनोळखी एका महिलेने चॉकलेट दिले आणि त्यांच्या कानातील सोन्याच्या रिंग काढून पलायन केले. ही घटना बुधवारी (ता. २६) दुपारी मुली घराबाहेर खेळताना घडला. मुलीच्या कानात रिंग दिसत नसल्याने चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. यामध्ये सुनीता यांच्या मुलीचे पाच हजार तर दुसऱ्या मुलीचे सात हजार असे बारा हजारांचे दागिने चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कळवा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT