निवडणूक पुढे गेली तरी शिवसेनेचा वेग कायम!
खासदार शिंदेंचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस
अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषद निवडणूक स्थगित होऊनही शिवसेनेचा (शिंदे गट) वेग अजिबात कमी होणार नाही, असा ठाम संदेश देत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी (ता. १) उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा विशेष मेळावा घेऊन प्रचाराला नवे बळ दिले.
पनवेलकर हॉल येथे पार पडलेल्या या बैठकीत निवडणूक पुढे ढकलल्याने उमेदवारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम, अनिश्चितता आणि मानसिक दडपण दूर करण्यासाठी खासदार शिंदेंनी थेट संवाद साधला आणि त्यांना धैर्य देणारा बूस्टर डोस दिला. खासदार शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना म्हटले, की निवडणूक पुढे गेली तरी आपला वेग थांबणार नाही. पुढील १८ दिवसांत प्रत्येक घरापर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवणे हेच आपले लक्ष्य असले पाहिजे. या वेळी त्यांनी प्रचाराची नवी दिशा, संघटनात्मक बळकटी आणि मतदारांशी संपर्क मोहिमेच्या रणनीतीबद्दल काटेकोर नियोजनाच्या स्पष्ट सूचना दिल्या. अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २० डिसेंबरला होणार असल्याने पुढील प्रत्येक क्षण शिस्तबद्धतेने वापरण्याचे आवाहनही शिंदेंनी केले.
संघटनेत नवचैतन्य
खासदारांच्या या वक्तव्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे उमेदवारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या बैठकीस कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांच्यासह सर्व विभागांचे उमेदवार आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सभेला कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.