रायन मिनिथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ठाण्यातील तब्बल नऊ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
भाईंदर, ता. २ (बातमीदार) ः रायन स्पोर्ट्स क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली रायन मिनिथॉन २०२५-२६ उत्साहात पार पडली. बोरिवली येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या मैदानावर आयोजित या उपक्रमात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे विभागातील ३५ शाळांमधील तब्बल ९ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे हे २६ वे वर्ष असून, आतापर्यंतच्या प्रवासातील ही २२० वी शर्यत ठरली.
या मिनिथॉनमध्ये वयोगटानुसार तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १२ वर्षांखालील गटासाठी २ किमी, १४ वर्षांखालील गटासाठी ३ किमी, तर १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी ४ किमी धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटामध्ये स्पर्धकांनी उत्कृष्ट क्रीडाशिस्त, तयारी आणि उत्साह दाखवत शर्यत रंगतदार केली. रायन ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका सोनल पिंटो यांनी हिरवा झेंडा दाखवून शर्यतीची औपचारिक सुरुवात केली. कार्यक्रमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक नामांकित क्रीडापटू विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजकांकडून त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या निकालांमध्ये गोरेगाव येथील सेंट झेवियर्स हायस्कूलने एकूण विजेतेपद पटकावले, तर बोरिवलीच्या सेंट लॉरेन्स हायस्कूलने उपविजेतेपद मिळवले. रायन ख्रिश्चन हायस्कूल द्वितीय उपविजेता ठरले. स्पर्धेपूर्वी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाहुण्यांनी शाळा परिसरात प्रतीकात्मक वृक्षारोपण केले. मिनिथॉनसोबतच विद्यार्थ्यांच्या नृत्य व संगीताच्या सादरीकरणांनी कार्यक्रमाला उत्साहाचे रंग भरले. मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे ही मिनिथॉन यावर्षीही अत्यंत यशस्वी ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.