‘सिंदूर’साठी नौदल सज्ज होते!
व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सेना आणि वायुसेना प्रत्यक्ष लढाईत गुंतलेली असताना भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज होते. गरज भासल्यास तत्काळ कारवाईसाठी उतरायला तयार होते. पाकिस्तानने केलेली शस्त्रसंधीची मागणी हेच आमच्या क्षमतेचे प्रदर्शन असल्याची माहिती पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी मंगळवारी (ता. २) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी या वेळी नौदलाचे वर्षभराचे कामकाज, सुरक्षेची आव्हाने आणि महत्त्वाचे उपक्रम याबद्दल माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय नौदलाने ३०पेक्षा अधिक जहाजे आणि पाणबुड्या समुद्रात उभ्या केल्या. आयएनएस विक्रांत कॅरिअर बॅटल ग्रुपच्या संरक्षणाखाली मकरान किनाऱ्यावर फ्रंटलाइन युद्धनौका प्रत्यक्ष कारवाईसाठी तयार होत्या. एप्रिलमध्ये केलेल्या आमच्या शस्त्रचाचण्यांमुळे पाकिस्तान नौदलाने आपल्या जहाजांना खोल समुद्रात न नेता किनाऱ्यालाच रोखून धरले. आमची क्षमता आणि तयारी त्यांनी स्पष्टपणे पाहिली. त्यामुळे नौदलाच्या सज्जतेमुळे पाकिस्तानला परिस्थितीचे गांभीर्य समजले. जर नौदलाने हल्ला केला असता तर संघर्षाचे रूप आणखी तीव्र झाले असते. हीच भीती लक्षात घेऊन पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली, असे स्वामीनाथन यांनी सांगितले.
...
पाकच्या क्षेपणास्त्र चाचणीवर नजर
पाकिस्तानने नुकतीच क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्याबद्दल त्यांनी सांगितले, की ही चाचणी आम्ही संपूर्णपणे मॉनिटर केली. पाकिस्तान ते स्वदेशी असल्याचे सांगत असले तरी आमच्या माहितीप्रमाणे तसे नाही. हे क्षेपणास्त्र सेवेत दाखल झाले तर त्यानुसार आमच्या योजना आणि प्रत्युत्तर प्रणाली तयार आहेत.
...
लढाऊ जेटकडेही लक्ष
तुर्कीने अलीकडेच जगातील पहिली मानवरहित हवाई-ते-हवाई हल्ला क्षमता असलेली जेट प्रणालीची चाचणी केली. याबद्दल ते म्हणाले, की
हे तंत्रज्ञान प्रगत आहे; परंतु विमान मानवी पायलटसह असो किंवा मानवरहित त्याचे उद्दिष्ट तेच राहते. त्याचा वापर कोणत्या पद्धतीने होतोय, यावर आम्ही सतत लक्ष ठेवत आहोत.
...
आधुनिक युद्धात यूएव्हीचे वाढते महत्त्व
ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहने आता युद्धातील अत्यंत महत्त्वाचा भाग झाली आहेत. आमची यूएव्ही प्रणाली अनेक वर्षांपासून वापरात आहे. आता नौदल अत्याधुनिक ड्रोन खरेदी करीत आहे. त्यामुळे आमची गस्त, नजर ठेवणे आणि लक्ष्य साधण्याची क्षमता आणखी मजबूत होईल, असेही स्वामीनाथन यांनी सांगितले.
...
क्षमतावाढीवर भर
स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले, की आधुनिक युद्धपद्धती बदलत आहेत आणि भारतीय नौदल त्यानुसार आपली क्षमता सातत्याने वाढवत आहे. नवीन तंत्रज्ञान, प्रगत शस्त्रे, ड्रोन प्रणाली आणि स्वतःची क्षमता यांना आम्ही सातत्याने बळकटी देत आहोत. समुद्रातील सुरक्षा, भारताचे हित आणि ऑपरेशन्स यासाठी नौदल नेहमी सज्ज राहील, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.