मुंबई

नवी मुंबई येथे अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय मंजूर करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना साकडे...

CD

नवी मुंबई शहरात अन्न आणि औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय व्हावे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदेव भगत यांची मागणी

तुर्भे, ता. २ (बातमीदार) : भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीला चाप बसवण्यासाठी नवी मुंबई शहरात अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय असावे, अशी मागणी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे.
नवी मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. अशा परिस्थितीत या शहराला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालय असणे आवश्यक आहे. ठाणे येथे अन्न व औषध प्रशासनाचे जिल्हास्तरीय कार्यालय आहे. नवी मुंबई शहरातील नागरिकांना संबंधित कामांसाठी ठाण्याला जावे लागते, असे भगत यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई शहरात काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, भेसळयुक्त मिठाई, ज्यूस, चायनीज पदार्थ विकणारी दुकाने आहेत. त्यावर कोणाचाही अंकुश नाही. अशा खाद्यपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ शकते. त्यामुळे खाद्यपदार्थांचा दर्जा जपला जावा, संशयास्पद ठिकाणी अन्नपदार्थांची तपासणी व्हावी, यासाठी नवी मुंबईत स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालय असावे, असे भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT