मुंबई

बनावट क्रमांकाच्या वाहनात पिस्तूल

CD

बनावट क्रमांकाच्या वाहनात पिस्तूल
खांदेश्वर पोलिसांकडून मुंबईतील एकाला अटक
पनवेल, ता. ३ (बातमीदार) ः नवीन पनवेल (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातून बनावट वाहन क्रमांक असलेली चारचाकी पनवेल वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त केली आहे. या कारमध्ये पिस्तूल आढळल्याने खांदेश्वर पोलिसांनी मुंबईतील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
नवीन पनवेल रेल्वे स्थानक (पूर्व) परिसरात वाहतूक नियमन करताना (एमएच ०३ एएच ७८६३) क्रमांकाची कार आढळली होती. पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे वाहन क्रमांकावरून पोलिसांनी गाडीच्या मालकाशी संपर्क साधला होता. या वेळी ही गाडी माझी नसून कोणीतरी वाहन क्रमांकाचा गैरवापर करत असल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता कारच्या समोरील दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले. या वेळी कारमध्ये पिस्तूल आढळून आले. तसेच वाहन परवानावरून मुंबई विभागात विविध गुन्हे नोंद असलेल्या राजेंद्र निकमची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शस्त्र बाळगण्याच्या संशयावरून राजेंद्र निकमची खांदेश्वर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT